Gold Rate Today Dainik Gomantak
देश

Gold Rate Today: सोनं झालं स्वस्त... 4 दिवसांत 7,000 रुपयांची घसरण, 10 ग्रॅम 24 कॅरेटचा नवीन भाव जाणून घ्या

Gold Rate: गेल्या आठवड्यात सोन्याच्या किमतींनी गुंतवणूकदारांना अक्षरशः धक्का दिला आहे.

Sameer Amunekar

गेल्या आठवड्यात सोन्याच्या किमतींनी गुंतवणूकदारांना अक्षरशः धक्का दिला आहे. फक्त चार दिवसांच्या आत सोन्याच्या दरात प्रति १० ग्रॅम तब्बल ₹७,००० पेक्षा जास्त घसरण झाली आहे. ही घट केवळ आंतरराष्ट्रीय बाजारातच नव्हे, तर मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) आणि देशांतर्गत बाजारातही स्पष्टपणे जाणवली आहे.

आठवड्याच्या पहिल्या दिवशी म्हणजेच सोमवार, २० ऑक्टोबर रोजी २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमची किंमत ₹१.३० लाखांपेक्षा जास्त होती, तर आठवड्याच्या अखेरीस ती ₹१.२३ लाखांपर्यंत घसरली. म्हणजेच, गुंतवणूकदारांना पाच दिवसांतच मोठा फटका बसला आहे.

२० ऑक्टोबर रोजी MCX वर ५ डिसेंबरची मुदत संपणाऱ्या ९९९ शुद्धतेच्या सोन्याची किंमत होती ₹१,३०,६२४ प्रति १० ग्रॅम. मात्र, त्यानंतर सतत घसरण होत गेली आणि २५ ऑक्टोबर रोजी ती ₹१,२३,२५५ प्रति १० ग्रॅम इतकी खाली आली. एकूण घसरण: ₹७,३६९ प्रति १० ग्रॅम

देशांतर्गत बाजारातील सोन्याचे भाव

MCX सोबतच देशांतर्गत बाजारातही सोन्याच्या दरात मोठी घसरण दिसली आहे. इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) च्या आकडेवारीनुसार, २० ऑक्टोबर: २४ कॅरेट सोने ₹१,२६,७३० वर उघडले, आणि ₹१,२७,६३३ वर बंद झाले. २१ ऑक्टोबर: बाजार बंद होता. २२ ऑक्टोबरनंतर: व्यवहार पुन्हा सुरू होताच दरात वेगाने घसरण झाली. २५ ऑक्टोबर (शुक्रवार): २४ कॅरेट सोन्याचा दर ₹१,२१,५१८ वर आला. म्हणजेच फक्त काही दिवसांतच ₹६,११५ प्रति १० ग्रॅम इतकी घट झाली.

सध्याचे दर (प्रति १० ग्रॅम)

२४ कॅरेट - १,२१,५१८, २२ कॅरेट - १,२१,०३०, २० कॅरेट- १,११,३१०, १८ कॅरेट - ९१,१४०

IBJA चे दर देशभर एकसमान असतात, परंतु दागिने खरेदी करताना तुम्हाला ३% जीएसटी आणि मेकिंग चार्जेस भरावे लागतात. हे चार्जेस प्रत्येक शहरात आणि ज्वेलरनुसार बदलतात, त्यामुळे अंतिम किंमत थोडी जास्त असते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Liberation Day: नेहरूंनी दिलेला 'तो' एक आदेश अन् गोवा झाला मुक्त; वाचा 36 तासांच्या धडाकेबाज मोहिमेचा थरार

Horoscope: ग्रहांची शुभ स्थिती! 'या' राशींना मिळणार भाग्याची साथ, वाचा तुमचे राशी भविष्य

Syed Mushtaq Ali Trophy 2025: ईशान किशनचं वादळ अन् झारखंडचा ऐतिहासिक विजय; फायनलमध्ये हरियाणाचा धुव्वा उडवत पटकावलं विजेतेपद! VIDEO

Goa Robbery Incident: गेस्ट हाऊसमध्ये घुसून जर्मन पर्यटकाची लूट, 18 वर्षाच्या भामट्याला बेळगावात अटक; कळंगुट पोलिसांची कारवाई

गोव्यात नाताळची जय्यत तयारी! बाजारपेठांमध्ये 'ख्रिसमस'ची धूम; 10 फुटी झाडांनी वेधलं लक्ष

SCROLL FOR NEXT