Gold Price Today Dainik Gomantak
देश

Gold Price Today: दिवाळीची धामधुम! सोने आणि चांदीचे भाव गगनाला भिडले की उतरले? जाणून घ्या

Gold Price: सोमवारी देशभरात दिवाळीचा उत्साह पाहायला मिळाला. फटाके, दिवे आणि आनंदाच्या वातावरणात सण साजरा होत असतानाच बाजारातही चांगलीच चकाकी दिसली.

Sameer Amunekar

सोमवारी देशभरात दिवाळीचा उत्साह पाहायला मिळत आहे. फटाके, दिवे आणि आनंदाच्या वातावरणात सण साजरा होत असतानाच बाजारातही चांगलीच चकाकी दिसत आहे. सोन्या-चांदीच्या किमतींनी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर झपाट्याने वाढ घेतली असून, आता लग्नाच्या हंगामाच्या तोंडावर या दरांमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सध्या २२ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम ₹१,१९,९५५, तर २४ कॅरेट सोन्याचा भाव ₹१,३०,८६० इतका झाला आहे. दरम्यान, चांदीचा दर प्रति किलो ₹१,५८,५०० वर पोहोचला आहे. या वाढत्या दरांमुळे ग्राहकांना दागिने खरेदी करताना मोठा खर्च करावा लागणार आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेचा विचार केला तर अमेरिकेच्या कॉमेक्स मार्केटमध्ये सोन्याचे दर प्रति औंस ₹४,३४५.४० वर आहेत, जे मागील तुलनेत ०.३२ टक्क्यांनी कमी आहेत. चांदीही प्रति औंस ₹५०.५५, म्हणजेच १.६२ टक्क्यांनी घसरली आहे.

तथापि, मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर मात्र सोन्याचे दर उलट वाढले आहेत.सोनं ₹३,५८० किंवा २.८२ टक्क्यांनी वाढून ₹१,३०,५८८ प्रति १० ग्रॅम झाले आहे. चांदी देखील ₹१,५७१ किंवा १ टक्क्यांनी वाढून ₹१,५८,१७५ प्रति किलो झाली आहे.

देशातील प्रमुख शहरांतील भाव

  • दिल्लीमध्ये, २२ कॅरेट सोने ₹१,१९,५३३ आणि २४ कॅरेट सोने ₹१,३०,४०० प्रति १० ग्रॅम, तर चांदी ₹१,५७,९४० प्रति किलो झाली आहे.

  • मुंबईत, २२ कॅरेट सोने ₹१,१९,७३५, २४ कॅरेट सोने ₹१,३०,६२० प्रति १० ग्रॅम, आणि चांदी ₹१,५८,२१० प्रति किलो वर आहे.

  • कोलकाता येथे २२ कॅरेट सोन्याचा भाव ₹१,१९,५७९, २४ कॅरेट सोनं ₹१,३०,४५०, आणि चांदी ₹१,५८,००० प्रति किलो वर स्थिर आहे.

  • चेन्नईमध्ये, २२ कॅरेट सोनं ₹१,२०,०८३, २४ कॅरेट सोनं ₹१,३१,०००, तर चांदी ₹१,५८,६७० प्रति किलो आहे.

दिवाळीनंतर नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या लग्नाच्या हंगामामुळे सोन्या-चांदीच्या मागणीत पुन्हा वाढ होईल. त्यामुळे पुढील काही आठवड्यांत त्यांच्या दरांमध्ये आणखी उसळी येण्याची शक्यता आहे. सध्या गुंतवणूकदार आणि ग्राहक दोघांनीही बाजारातील घडामोडींवर लक्ष ठेवणे गरजेचे असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope April 2026: एप्रिल महिन्यात अग्निपरीक्षा! 'या' राशीच्या नशिबात शनी अन् राहु-केतूचा 'डेंजर झोन'; ग्रहांची स्थिती ठरणार घातक

8th Pay Commission: पगारवाढीचा 'धमाका'! 7व्या वेतन आयोगाचे सर्व रेकॉर्ड मोडणार 8वा वेतन आयोग? महागाईला उत्तर देण्यासाठी नवा प्लॅन

Responsible Tourism in Goa: त्रास फक्त पर्यटकांनाच होतो, गोमंतकीयांना होत नाही का? बेजबाबदार वर्तनामुळे वादाचे पडसाद

Chorla Ghat Traffic: चोर्ला घाटात जीव धोक्‍यात, डंपरांचा सुळसुळाट! वाहतूक कोंडीसह अपघातांचा धोका; बेळगावला खरेदीला जाणं बनलं कठीण

Omkar Elephant Goa: ‘ओंकार’ तोरसे, तांबोसेत घुसण्याच्या तयारीत, पिकांची हानी! तातडीने बंदोबस्ताची शेतकऱ्यांची मागणी

SCROLL FOR NEXT