Go First  Dainik Gomantak
देश

Go First च्या प्रवाशांना मोठा झटका, 15 मे पर्यंत विमान तिकिटांचे बुकिंग रद्द

डीजीसीएने कंपनीला रद्द केलेल्या फ्लाइटचे पैसे प्रवाशांना परत करण्याचे आदेश दिले आहेत.

दैनिक गोमन्तक

Go First:विमान प्रवास सेवेतील सर्वात मोठी कंपनी असलेली गो फर्स्ट कंपनी ही सध्या दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहे. दरम्यान, कंपनीने यापूर्वी 3 ते 5 मे पर्यंत 3 दिवसांसाठी आपली सर्व उड्डाणे रद्द केली होती. आता त्याची तारीख 9 मे पर्यंत वाढली आहे. दुसरीकडे, एव्हिएशन रेग्युलेटर डायरेक्टरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन (DGCA) ने कंपनीला रद्द केलेल्या फ्लाइटचे पैसे प्रवाशांना परत करण्याचे आदेश दिले आहेत.

GoFirst ने एक निवेदन जारी केले आहे की ऑपरेशनल कारणांमुळे त्यांनी 9 मे पर्यंत सर्व उड्डाणे रद्द केली आहेत. डीजीसीएच्या कारणे दाखवा या नोटीसला उत्तर देताना कंपनीने 15 मे पर्यंत विमान तिकिटांचे बुकिंगही रद्द केल्याची माहिती दिली आहे. दरम्यान, डीजीसीएच्या रिफंड ऑर्डरवर कंपनीचे म्हणणे आहे की ते लवकरच प्रवाशांचे पैसे परत करणार आहे.

गो फर्स्ट आर्थिक अडचणीत असल्याने NClT कडे दिवाळखोरी घोषित करण्यासंदर्भात तक्रार केली आहे. ही कंपनी वाडिया ग्रुपची आहे. गेल्या काही दिवसांपासून कंपनीची पत खालवत आहे.दरम्यान, गो फर्स्ट एअरलाईन्सने तेल कंपन्यांची थकबाकी भरण्यास असमर्थता दाखवली आहे. या सोबतच विमान कंपनीसाठी इंजिन बनवणाऱ्या प्रॅट अँड व्हिटनी या अमेरिकन कंपनीने इंजिन पुरवठा देखील बंद केला. त्यात कंपनीकडे निधीची मोठी कमतरता आहे.

रोख रकमे अभावी कंपनी तेल कंपन्यांची थकबाकीही भरण्यास सक्षम नाही, त्यामुळे कंपन्यांनी गो फर्स्टला इंधन देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे कंपनीने ही उड्डाणे रद्द केल्याचे म्हटले आहे. दरम्यान, या प्रकारात नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया म्हणाले की, सरकार अडचणीत असलेल्या गो फर्स्ट एअरलाईनला शक्य ती मदत करत आहे. संपूर्ण घटनेवर आम्ही लक्ष ठेवून आहोत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sporting Club Goa: दीपांकुर शर्मा यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी; आय-लीग 2 मध्ये दमदार कामगिरीचे लक्ष्य

Goa Research: त्वचेच्या उपचारात 3D तंत्रज्ञानाची नवी झेप! स्वस्त आणि सुरक्षित जलजेल विकसित

Colvale Central Jail: कोलवाळ कारागृहात वाईननिर्मितीचा आरोप; प्रशासनाचा स्पष्ट इन्कार, 'सुरक्षा कडक केल्याने नाराजांचे षड्‌यंत्र'

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Toxic Movie Release: 'टॉक्सिक'चा धमाका! रॉकस्टार यशची रुपेरी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री; थिएटर्सबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी VIDEO

SCROLL FOR NEXT