Justice Chandrachud Dainik Gomantak
देश

Chief Justice DY Chandrachud: 'चंद्रचूड यांना बंदूक देऊन मणिपूरला पाठवा...,' लेखक बद्री शेषाद्रीचे वादग्रस्त वक्तव्य

मणिपूरमधील हिंसाचार थांबण्याचं नाव घेत नाही. यातच, तामिळनाडू पोलिसांनी शनिवारी राजकीय विश्लेषक आणि लेखक बद्री शेषाद्री यांना अटक केली.

Manish Jadhav

Manipur Violence: मणिपूरमधील हिंसाचार थांबण्याचं नाव घेत नाही. यातच, तामिळनाडू पोलिसांनी शनिवारी राजकीय विश्लेषक आणि लेखक बद्री शेषाद्री यांना अटक केली.

यूट्यूबवरील मुलाखतीदरम्यान मणिपूर हिंसाचार आणि भारताचे सरन्यायाधीश DY चंद्रचूड यांच्यावरील कथित 'प्रक्षोभक' टिप्पणीसाठी त्यांना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेषाद्री यांना कलम 153, 152 (A) आणि 505(1)(B) अंतर्गत अटक करण्यात आली आहे.

मुलाखतीत शेषाद्री म्हणाले की, "सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) म्हटले होते की, तुम्ही (सरकार) काही करु शकत नसाल तर आम्ही (कोर्ट) करु. चंद्रचूड यांना बंदूक देऊन मणिपूरला पाठवा. ते शांतता प्रस्थापित करु शकतात का ते पाहूया." शेषाद्री पुढे म्हणाले की, "मणिपूर हे डोंगराळ राज्य आहे. आम्ही हिंसाचार रोखू शकत नाही."

दुसरीकडे, फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट (FIR) मध्ये असे म्हटले आहे की, शेषाद्री यांच्या विरोधात वकील काविरासू यांनी तक्रार दाखल केली होती. तक्रारीत त्यांनी सांगितले की, त्यांनी 22 जुलै रोजी YouTube वर एक मुलाखत पाहिली, ज्यामध्ये शेषाद्री यांनी सर्वोच्च न्यायालय आणि CJI चंद्रचूड यांच्यावर टीका केली होती.

तसेच, वकील कविरासू यांच्या तक्रारीच्या आधारे पेरांबलूर जिल्हा पोलिसांनी शेषाद्री यांना शनिवारी सकाळी अटक केली. ते कुन्नम जिल्ह्यातील रहिवासी आहेत.

पोलिसांनी (Police) शेषाद्री यांच्यावर कलम 153 (दंगल घडवण्याच्या उद्देशाने चिथावणीखोर वक्तव्ये करणे), 153 (1) (A) (गटांमधील शत्रुत्वाला प्रोत्साहन देणारी वक्तव्ये करणे) आणि 505 (1) (B) नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

भारतीय जनता पक्षाचे (BJP) राज्य युनिटचे प्रमुख के अन्नामलाई यांनी शेषाद्री यांच्या अटकेचा निषेध केला. त्यांनी सत्ताधारी द्रमुख मुन्नेत्र कळघम (DMK) वर सामान्य माणसाने व्यक्त केलेल्या मतांना सामोरे न जाण्यासाठी अटकेची रणनीती अवलंबल्याचा आरोप केला.

अण्णामलाई यांनी ट्विट केले की, "सत्ताधारी द्रमुकचा सूडाचा अजेंडा पार पाडणे ही पोलिसांची जबाबदारी आहे का?"

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT