Supreme Court  Dainik Gomantak
देश

Supreme Court: आरक्षणाच्या मुद्यावर SC कठोर, याचिका मागे घ्या नाहीतर...

Supreme Court: देशातील मागास जातींचे आरक्षण रद्द करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे.

दैनिक गोमन्तक

Supreme Court: देशातील मागास जातींचे आरक्षण रद्द करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. या याचिकेचे वर्णन प्रसिद्धीसाठी दाखल करण्यात आलेली याचिका असल्याचे सांगत न्यायालयाने दंड आकारण्याचा इशारा दिला. एलएलएमची विद्यार्थिनी शिवानी पनवार हिच्या वतीने ही याचिका दाखल करण्यात आली. न्यायालयाची भूमिका पाहून याचिकाकर्त्याच्या वकिलांनी अर्ज मागे घेतला.

'तुम्ही याचिका मागे न घेतल्यास तुम्हाला दंड होईल'

ही याचिका सर्वोच्च न्यायालयातील (Supreme Court) सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड आणि न्यायमूर्ती पीएस नरसिंह यांच्या खंडपीठासमोर आली. त्यावर नाराजी व्यक्त करत खंडपीठाने म्हटले की, 'देशातील आरक्षण व्यवस्था संपली पाहिजे, ही तुमची याचिका आहे. तुम्ही म्हणता की, आरक्षण हे समानतेच्या विरोधात असून जातिव्यवस्थेला प्रोत्साहन देते. एलएलएमचे विद्यार्थी (Students) प्रसिद्धीसाठी अशी याचिका दाखल करत आहेत. हा कायदेशीर प्रक्रियेचा दुरुपयोग आहे. तुम्ही याचिका मागे न घेतल्यास आम्ही दंड आकारु.' यानंतर याचिकाकर्त्याच्या वकिलाने अर्ज मागे घेतला.

घटनापीठाच्या न्यायाधीशांनी आरक्षणावर प्रश्न उपस्थित केले

अलीकडेच EWS आरक्षण कायम ठेवण्याच्या निर्णयात, घटनापीठाच्या दोन न्यायाधीशांनी स्वातंत्र्याच्या 70 वर्षांनंतरही आरक्षणाच्या गरजेवर प्रश्न उपस्थित केले. न्यायमूर्ती पार्डीवाला यांनी निकालात लिहिले होते की, 'बाबासाहेब आंबेडकरांचा उद्देश फक्त दहा वर्षांसाठी आरक्षण लागू करुन सामाजिक सलोखा प्रस्थापित करणे हा होता. गेल्या 70 वर्षांपासून आरक्षण सुरु असले तरी. आरक्षण अनिश्चित काळासाठी सुरु ठेवू नये जेणेकरुन ते निहित स्वार्थ पूर्ण करण्याचे साधन बनू नये.'

इतकेच नव्हे तर, शिक्षण आणि नोकरीचा महत्त्वाचा दर्जा प्राप्त केलेल्या मागासवर्गीय लोकांना आरक्षणाच्या लाभापासून दूर केले पाहिजे, असेही न्यायमूर्ती पार्डीवाला यांचे मत होते. जेणेकरुन आरक्षणाचा लाभ त्यांना मिळू शकेल, ज्यांना त्याची खरी गरज आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT