UGC Exam Result Dainik Goamantak
देश

NTA च्या UGC, NET चा निकाल या लिंक द्वारे घ्या जाणून

या परीक्षेत सहभागी झालेले उमेदवार हे नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन त्यांचा निकाल पाहू शकतात.

दैनिक गोमन्तक

UGC NET निकाल 2021: विद्यापीठ अनुदान आयोग राष्ट्रीय पात्रता परीक्षा, UGC NET 2021 चा निकाल जाहीर झाला आहे. डिसेंबर 2020 आणि जून 2021 परीक्षांसाठी हा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेत सहभागी झालेले उमेदवार हे नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ugcnet.nta.nic.in च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन त्यांचा निकाल पाहू शकतात. (Get the exam results of UGC, NET taken by NTA through this link Knowing)

UGC NET निकाल 2021 हा त्या परीक्षांसाठी आहे; ज्या नोव्हेंबर 2021 ते 5 जानेवारी 2022 या कालावधीत घेण्यात आल्या होत्या. UGC NET निकाल 2021 बघण्यासाठी या पायऱ्यांचा वापर करा.

1: प्रथम UGC NET निकाल 2021 च्या अधिकृत वेबसाइट ugcnet.nta.nic.in वर जा.

2: मुख्यपृष्ठावर दिलेल्या निकालाच्या लिंकवर क्लिक करा.

3: उमेदवारासमोर एक नवीन पृष्ठ सुरु होईल, यात उमेदवाराने विनंती केलेली माहिती प्रविष्ट करा.

4: माहिती प्रविष्ट केल्यानंतर, उमेदवाराने सबमिट बटण दाबावे.

5: उमेदवाराचा निकाल त्यांच्या स्क्रीनवर प्रदर्शित केला जाईल. ते डाउनलोड करा.

UGC NET 2021 परीक्षा देशातील 239 शहरांमधील 837 परीक्षा केंद्रांवर 81 विषयांमध्ये घेण्यात आली. JRF साठी UGC NET च्या निकालाची वैधता 3 वर्षे आहे तर सहाय्यक प्राध्यापकासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांचा निकाल आजीवन वैध आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ranji Trophy 2024: मोहितचा 'पंजा' अन् फलंदाजांचा जलवा, गोव्यानं उडवला मिझोरामचा धुव्वा; नोंदवला सलग चौथा विजय!

Goa Live Updates: एंटर एअरचे पहिले चार्टर गोव्यात दाखल!

Rajbagh Beach: राजबाग किनाऱ्याने घेतला 'मोकळा श्वास'! पर्यटन खात्याकडून सात बेकायदेशीर बांधकामे उद्ध्वस्त

Goa Onion Rates: कांद्याने आणले डोळ्यात पाणी! नासाडीमुळे दोन दिवसात दरांमध्ये तब्बल २० रुपयांनी वाढ, जाणून घ्या सध्याचा भाव

Margao News: स्वच्छतेसंदर्भात मडगाव पालिकेचा महत्त्वाचा निर्णय; या कारणासाठी नागरिक, पर्यटकांकडून वसूल केला जाईल दंड

SCROLL FOR NEXT