Arvind Kejriwal
Arvind KejriwalDainik Gomantak

छत्रपती शिवरायांना विनम्र अभिवादन, केजरीवालांचं मराठीत ट्वीट

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनीदेखील छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त मराठीत ट्वीट केले.
Published on

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त शिवनेरी किल्ल्यावर जन्मसोहळा साजरा झाला. आजचा दिवस शिवभक्त मोठ्या उत्साहात साजरा करतात. दरम्यान, देशातील अनेक नेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना आदरांजली वाहिली.

Arvind Kejriwal
कर्नाटकात सरकारी महाविद्यालयात टिळा लावणाऱ्या विद्यार्थ्याच्या प्रवेशावर बंदी

आम आदमी पार्टीचे (AAP) सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी मराठीत ट्वीट करत छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना दिली. "स्वराज्याचे स्वप्न साकार करणारे जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन", असे केजरीवाल यांनी ट्वीटमध्ये लिहिले आहे.

Arvind Kejriwal
शिवनेरी किल्लावरील भाषणावेळी अजित पवार का संतापले?

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनीदेखील छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त मराठीत ट्वीट केले. ट्वीटमध्ये मोदी लिहितात, “छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त मी त्यांना नमन करतो. त्यांचे सर्वोत्कृष्ट नेतृत्व आणि समाज कल्याणासाठीचा आग्रह अनेक पिढ्यांसाठी प्रेरक ठरला आहे. सत्य आणि न्याय या मूल्यांशी त्यांनी तडजोड केली नाही. त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”

यावर्षी प्रकृतीच्या कारणास्तव महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) शिवनेरी किल्ल्यावर उपस्थित राहू शकले नाहीत. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे शिव जन्मसोहळ्याला उपस्थित होते. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात हेसुद्धा शिवजन्म सोहळ्यासाठी शिवनेरीवर आले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com