Rajeev Shukla on Gautam Gambhir Future Dainik Gomantak
देश

VIDEO: गौतम गंभीरची प्रशिक्षकपदावरून हकालपट्टी निश्चित? 'BCCI'चे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...

Rajeev Shukla on Gautam Gambhir Future: भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून गौतम गंभीरची कारकीर्द सध्या एका वादळाच्या मधोमध उभी आहे.

Sameer Amunekar

नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून गौतम गंभीरची कारकीर्द सध्या एका वादळाच्या मधोमध उभी आहे. कसोटी क्रिकेटमधील टीम इंडियाच्या ढेपाळलेल्या कामगिरीमुळे गंभीरला पदावरून हटवले जाणार असल्याची जोरदार चर्चा रंगली होती. मात्र, या सर्व वावड्यांवर आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया देऊन पूर्णविराम दिला आहे.

कसोटीतील कामगिरी आणि वाढती टीका

२०२४ च्या मध्यात गंभीरने राहुल द्रविडकडून प्रशिक्षकपदाची सूत्रे हाती घेतली. तेव्हापासून मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये भारताने प्रगती केली असली, तरी कसोटी क्रिकेटमध्ये मात्र चित्र चिंताजनक आहे. न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मायदेशात झालेला दारूण पराभव चाहत्यांच्या पचनी पडलेला नाही.

गंभीरच्या मार्गदर्शनाखाली भारताने घरच्या मैदानावर तब्बल ५ कसोटी सामने गमावले आहेत, जो एका प्रशिक्षकासाठी अत्यंत खराब विक्रम मानला जात आहे. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतही अपेक्षित यश मिळाले नसल्याने गंभीरच्या 'कोचिंग स्टाईल'वर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते.

बीसीसीआयने अफवा फेटाळल्या

सोशल मीडियावर सुरू असलेल्या या सर्व चर्चांवर राजीव शुक्ला यांनी एएनआयला (ANI) दिलेल्या मुलाखतीत स्पष्टीकरण दिले. शुक्ला म्हणाले की, "गौतम गंभीरला प्रशिक्षकपदावरून हटवण्याबाबत ज्या काही बातम्या मीडियामध्ये फिरत आहेत, त्या पूर्णपणे निराधार आहेत.

बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी आधीच स्पष्ट केले आहे की, सध्या नवीन प्रशिक्षक नियुक्त करण्याचा आमचा कोणताही विचार नाही. या निव्वळ अफवा असून चाहत्यांनी त्यावर विश्वास ठेवू नये." बोर्डाचा गंभीरवर अजूनही विश्वास असल्याचे या विधानातून स्पष्ट झाले आहे.

व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये 'गंभीर' दबदबा

एकीकडे कसोटीत संघर्ष सुरू असताना, दुसऱ्या बाजूला गंभीरच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाने वनडे आणि टी-२० मध्ये मात्र सुवर्णकाळ पाहिला आहे. तब्बल १२ वर्षांनंतर भारताने चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरले आणि त्यानंतर २०२५ चा आशिया कपही जिंकला.

विशेष म्हणजे, गंभीर प्रशिक्षक झाल्यापासून भारताने एकही टी-२० मालिका गमावलेली नाही. मर्यादित षटकांच्या सामन्यांमधील हे सातत्य पाहता, बीसीसीआय सध्या तरी गंभीरच्या पाठीशी खंबीरपणे उभी असल्याचे दिसून येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Session: 5 दिवसांचे हिवाळी अधिवेशन, 25 बळींचा हिशोब; सरकारला घेरण्यासाठी विरोधकांचा मास्टरप्लॅन काय?

जिल्हा पंचायतीचे नवे कारभारी! रेश्मा बांदोडकर उत्तर गोवा तर सिद्धार्थ गावस देसाई दक्षिण गोव्याच्या अध्यक्षपदी विराजमान

गोव्यात 'थर्टी फर्स्ट'चा जल्लोष! नवीन वर्षाच्या स्वागतासाठी 'हे' आहेत सर्वोत्तम पार्टी डेस्टिनेशन्स

Saudi Arabia Airstrike: मध्यपूर्वेत युद्धाचा भडका! सौदीचा येमेनवर ताबडतोड हवाई हल्ला; UAE कडून आलेली शस्त्रास्त्रांची जहाजे उद्ध्वस्त Watch Video

Sara Tendulkar In Goa: सचिनची लेक सारा गोव्यात घेतेय सुट्ट्यांचा आनंद, बीच लूक चर्चेत; पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT