Sea Pollution Viral Video Dainik Gomantak
देश

VIDEO: "म्हणून 50 हजार खर्चून गोव्याला जातो!" समुद्रात कचरा फेकणाऱ्या पर्यटकाचा व्हिडिओ पाहून नेटकर्‍यांचा पारा चढला

Mumbai Viral Video: गेटवे ऑफ इंडिया परिसरात घडलेल्या एका धक्कादायक घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून, यावरून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

Sameer Panditrao

मुंबई: मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया परिसरात घडलेल्या एका धक्कादायक घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून, यावरून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. गेटवे ऑफ इंडियासमोर एका व्यक्तीने अरबी समुद्रात थेट कचरा फेकल्याची ही घटना असून, ती तेथे उपस्थित असलेल्या एका परदेशी पर्यटकाने आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केली.

व्हिडिओमध्ये संबंधित व्यक्ती समुद्रात कचरा टाकताना स्पष्टपणे दिसत असून, हे पाहून परदेशी पर्यटकाने त्याला तात्काळ “What is that?” असा सवाल करत जाब विचारला. मात्र, त्या व्यक्तीने कोणतेही समाधानकारक उत्तर दिले नसल्याचे व्हिडिओत दिसून येते. काही सेकंदांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड होताच तो झपाट्याने व्हायरल झाला आणि नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

या व्हिडिओखाली अनेकांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. “या व्यक्तीवर काही कारवाई झाली आहे का?” असा सवाल एका युजरने उपस्थित केला आहे. तर एका भारतीय नागरिकाने हा व्हिडिओ शेअर करताना मुंबईच्या समुद्र प्रदूषणावर भाष्य केले आहे. “मुंबईचा समुद्र इतका खराब झाला आहे की आम्हाला स्वच्छ समुद्रासाठी पन्नास हजार रुपये खर्च करून गोव्याला जावे लागते,” अशी खोचक टिप्पणी त्याने केली आहे.

पर्यावरणप्रेमी आणि नागरिकांनीही या घटनेवर चिंता व्यक्त केली असून, पर्यटनस्थळांवरील स्वच्छतेबाबत प्रशासनाने कठोर भूमिका घ्यावी, अशी मागणी होत आहे. गेटवे ऑफ इंडिया हे देश-विदेशातील पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र असून, अशा प्रकारच्या घटनांमुळे मुंबईची आणि देशाची प्रतिमा मलीन होत असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले आहे.

दरम्यान, या प्रकरणी संबंधित व्यक्तीवर कोणती कारवाई झाली, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र, सोशल मीडियावरून उठलेल्या या आवाजामुळे प्रशासन जागे होईल, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Nightclub Fire: 25 जणांचा बळी गेला, 40 दिवस उलटले; मुख्य सूत्रधार अजूनही गुलदस्त्यात, जबाबदारी एकामेकांवर ढकलण्‍याची संगीत खुर्ची

India America Trade War: "मोदींशी लवकरात लवकर बोला'', ट्रम्प यांना खासदारांचं पत्र, भारत-अमेरिका 'ट्रेड वॉर'मध्ये आता डाळींचा पेच, कोण घेणार पुढाकार?

Goa Politics: खरी कुजबुज; काल किती खून झाले?

Goa Latest Updates: कुडचडे येथे भीषण अपघात: कार आणि डंपरची समोरासमोर धडक; एक जखमी

Goa Airline Incentive Scheme: गोव्यात विमान कंपन्यांना मिळणार 'बुस्टर डोस'! नवीन मार्गांसाठी तगडं अनुदान; मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली 'एअरलाईन इन्सेन्टिव्ह' योजना

SCROLL FOR NEXT