Sanjeev Maheshwari Jeeva  Dainik Gomantak
देश

Crime News UP : लखनौच्या कैसरबाग कोर्टात रक्तरंजित थरार; गँगस्टर संजीव जीवाची गोळ्या झाडून हत्या

Sanjeev Maheshwari Jeeva Murder: लखनौच्या कैसरबाग कोर्टात गँगस्टर संजीव माहेश्वरी जीवाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. हल्लेखोर वकिलाच्या वेशात होता.

Ashutosh Masgaunde

 लखनौमधील कैसरबाग कोर्टात गँगस्टर संजीव माहेश्वरी जीवाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. हल्लेखोर वकिलाच्या वेशात होता. संजीव माहेश्वरी हा मुख्तार अन्सारी यांच्या जवळचा होता.

जीवा भाजप नेते ब्रह्मदत्त द्विवेदी यांच्या हत्येतील आरोपी होता. संजीवला न्यायालयात हजर करण्यात येत होते, त्यावेळी हा हल्ला झाला. या गोळीबारात चार ते पाच जण जखमी झाल्याचेही वृत्त आहे.

संजीव माहेश्वरी जीवा हा पश्चिम यूपीचा कुख्यात गुंड होता. पोलिसांनी हल्लेखोराला ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी हल्लेखोराला जखमी अवस्थेत रुग्णालयात नेले. श्यामा यादव, केरकट जिल्हा जौनपूर असे मारेकऱ्याचे नाव आहे. पोलीसांनी तपास सुरू केला आहे.

वकिलांकडून सुरक्षेबाबत चिंता

 या घटनेनंतर वकिलांमध्ये संतापाचे वातावरण आहे. वकिलांनी सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली. हल्लेखोराने सहा गोळ्या झाडल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं. न्यायालयाच्या आवारात रक्ताचे डाग पडले आहेत. भिंतींवरही रक्ताचे डाग आहेत. घटनेनंतर पोलिसांनी मृतदेह तेथून बाहेर काढला.

प्रत्यक्षदर्शीने काय सांगितले?

एका वकिलाने सांगितले की, मी रोज इथे येतो पण आज जे घडले ते लज्जास्पद आहे. एका मुलीला गोळी लागली आहे. तिचे वडील आपल्या मुलीसाठी तळमळत आहेत. न्यायालयात येण्यापूर्वी तपास होतो, आमचीही चौकशी केली जाते. तरीही न्यायालयाच्या आवारात शस्त्रे येत आहेत.

संजीव जीव कोण होता?

 संजीव माहेश्वरी जीवा हा शामली जिल्ह्यातील रहिवासी होता. ९० च्या दशकाच्या सुरुवातीपासूनच तो गुन्हेगारीच्या दुनियेत वावरत होता. त्याच्यावर 22 हून अधिक गुन्हे दाखल आहेत. तो मुख्तार अन्सारीच्या जवळचा असल्याचे बोलले जाते.

सुरुवातीच्या काळात तो दवाखान्यात कंपाउंडर म्हणून काम करायचा. नोकरीच्या वेळी त्याने दवाखान्याच्या संचालकाचे अपहरण केले होते. कोलकातामध्ये एका व्यावसायिकाच्या मुलाचेही अपहरण करून 2 कोटींची खंडणी मागितली होती.

10 मे 1997 रोजी भाजपचे ज्येष्ठ नेते ब्रह्मदत्त द्विवेदी यांच्या हत्येप्रकरणी त्याचे नाव समोर आले. तो कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत होता. नुकतीच जिवाची मुझफ्फरनगरमधील सुमारे 4 कोटी रुपयांची मालमत्ता जिल्हा प्रशासनाने जप्त केली होती.

 ब्रम्हदत्त द्विवेदी कोण होते?

ब्रम्हदत्त द्विवेदी हे भाजपचे मोठे नेते होते. ते अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांच्या जवळचे होते. प्रसिद्ध गेस्ट हाऊसच्या घटनेवेळी त्यांनी मायावतींना वाचवले. 10 फेब्रुवारी 1997 रोजी त्यांची हत्या झाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: शुक्रवारचा दिवस ठरणार लाभदायक! 4 राशींना मिळणार यशाची नवी दिशा; कुटुंब, करिअर आणि आर्थिक क्षेत्रात सकारात्मक बदलांचे संकेत

Goa Drugs Case: काणकोणमध्ये अंमली पदार्थांवर कारवाई; 26.9 ग्रॅम चरससह हॉटेलच्या वेटरला अटक

Gold Rate: इराण शांतता करार ठरणार 'गेम चेंजर'! डॉलर घसरणार अन् सोन्याचा भाव गगनाला भिडणार; जे.पी. मॉर्गनचा 6000 डॉलर्सचा अंदाज

Aymen Hussein Story: आधी अल-कायदाने वडिलांना मारले, मग इसिसने भावाला पळवले! फिफा वर्ल्ड कपमध्ये इराकच्या अमीन हुसेनचा जगभर डंका

DR. Ram Manohar Lohia Journey: अकबरपूर ते बर्लिन अन् पुढे थेट गोव्याचा स्वातंत्र्यसंग्राम! डॉ. राममनोहर लोहियांच्या जागतिक जडणघडणीचा इतिहास

SCROLL FOR NEXT