Passport Dainik Gomantak
देश

Amazon वर मागवलं होतं पासपोर्टचं कव्हर, पण आलं दुसरंच काही

सुरुवातीला मी तो डमी पासपोर्ट (Passport) असल्याचे समजलो.

दैनिक गोमन्तक

मानवाच्या जीवनशैलीमध्ये तंत्रज्ञानामुळे इतक्या वेगाने बदल होत आहेत की, त्याची आपण कल्पनाही करु शकत नाही. आजकाल छोट्यातील छोटी वस्तू मागविण्यासाठी ऑनलाईन साईटचा आधार घेतो. सरास्सपणे आपण फ्लिलकार्ट, अॅमेझॉन यासरख्या सोशल साईटच्या माध्यमातून ऑनलाईन शॉपिंग करतो. यातच आता 30 ऑक्टोबर रोजी, केरळमधील वायनाड जिल्ह्यातील कन्यामबेट्टा गावात राहणाऱ्या मिथुन बाबूने अॅमेझॉनवर त्याच्या पासपोर्टसाठी पासपोर्ट पाऊची ऑर्डर दिली होती. दोन दिवसांनंतर 1 नोव्हेंबरला त्याला ऑर्डरही मिळाली. मात्र त्याने ज्यावेळी पॅकेज उघडले तेव्हा त्याला पासपोर्ट पाऊचच्या खिशात खराखुरा पासपोर्ट सापडला. “सुरुवातीला, मी तो डमी पासपोर्ट असल्याचे समजलो. तथापि, जवळून पाहिल्यानंतर मला कळले की, मला त्रिशूरचा मूळ रहिवासी असलेल्या व्यक्तीचा पासपोर्ट मिळाला आहे” असे मिथुनने माध्यमांशी बोलताना सांगितले.

दरम्यान, ''त्याने तातडीने अॅमेझॉन कस्टमर केअरशी संपर्क साधला असता. त्याला उत्तर देण्यात आले की, आम्ही यापुढे सावधगिरी बाळगू." त्यानंतर मिथुनने पासपोर्टचा मालक असलेल्या मोहम्मद सालीह (Mohammed Salih) याचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्याने शोध घेण्यासाठी पासपोर्टवरील पत्त्याचा आधार घेतला. सालीह यांच्याशी संपर्क साधण्यासाठी, पासपोर्ट परत करण्यासाठी आणि त्रिशूरच्या मूळ निवासी असलेल्या व्यक्तीचा पासपोर्ट पाऊचमध्ये कसा मिळाला हे समजून घेण्यासाठी शोधमोहीम सुरु केली.

मिथुनच्या म्हणण्यानुसार, सालीहने यापूर्वी अॅमेझॉनवरुन हीच पर्स मागवली होती, तेव्हा त्याचा पासपोर्ट आत ठेवला होता. मिथुनने पाउच परत करण्याचा निर्णय घेतला. मात्र, ऑर्डर परत करण्यापूर्वी तो पासपोर्ट काढायला विसरला.

"अमेझॉनवर विक्रेत्याची चूक होती. त्यांनी परत आलेले उत्पादन तपासले नाही आणि ते पुन्हा पॅक केले, असल्याचे मिथुन म्हणाला.

अलीकडेच ऑक्टोबरमध्ये एर्नाकुलम जिल्ह्यातील अलुवा येथील अमीन नावाच्या व्यक्तीने अॅमेझॉनवरुन आयफोन ऑर्डर केला होता, त्या बदल्यात त्याला एक साबण बार आणि 5 रुपयांचे नाणे मिळाले होते. तरुणाच्या तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान केरळमधील पोलिसांच्या निरिक्षणात आले की, झारखंडमधील एक व्यक्ती हाच फोन सप्टेंबरपासून वापरत आहे. पोलिसांनी विक्रेत्याशी संपर्क साधला तेव्हा त्यांनी चूक झाल्याचे मान्य केले आणि अमीनला 70,900 रुपयांची परतफेड केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: गोव्यात खळबळ! नावेलीमधून दोन अल्पवयीन मुलांचे अपहरण, मडगाव पोलिसांकडून तातडीने शोध सुरु

IFFI 2025 Opening Ceremony: 56व्या इफ्फीची दणक्यात सुरुवात, गोव्याच्या चित्ररथांची मिरवणूक ठरली सांस्कृतिक आणि कलात्मक पर्वणी VIDEO

Delhi Blast Case: दिल्ली स्फोट प्रकरणी 'एनआयए'ची मोठी कारवाई! चार मुख्य आरोपींना अटक; 2900 किलो स्फोटकांचा साठा जप्त

IFFI 2025: गोवा बनलं जागतिक सिनेमाचं घर, 56व्या 'IFFI'चं थाटात उद्घाटन; CM सावंतांनी सिनेप्रेमींना दिला 'येवकार'

Viral Video: कोरियन महिला खासदारानं गायलं 'वंदे मातरम', फिल्म बाजारमधील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल; तुम्ही पाहिलाय का?

SCROLL FOR NEXT