Petrol Diesel Price Hike Dainik Gomantak
देश

Petrol Diesel Price Hike: सर्वसामान्यांच्या खिशाला पुन्हा कात्री! 10 दिवसांत चौथ्यांदा पेट्रोल- डिझेलच्या किमतीत वाढ, नवीन दर तपासा

petrol diesel price hike may 25: देशात महागाईचा भडका उडाला असतानाच आता सर्वसामान्यांच्या खिशाला पुन्हा एकदा मोठा फटका बसला आहे.

Sameer Amunekar

नवी दिल्ली: देशात महागाईचा भडका उडाला असतानाच आता सर्वसामान्यांच्या खिशाला पुन्हा एकदा मोठा फटका बसला आहे. तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये पुन्हा एकदा मोठी वाढ केली आहे. विशेष म्हणजे, गेल्या अवघ्या १० दिवसांतील ही चौथी दरवाढ असल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. तेल कंपन्यांनी मध्यरात्रीच सर्व पेट्रोल पंपांना ईमेलद्वारे या दरवाढीची माहिती दिली असून, २५ मे रोजी सकाळी ६ वाजल्यापासून हे नवीन दर लागू करण्यात आले आहेत.

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी वाढ

ताज्या दरवाढीनुसार, पेट्रोलच्या दरात प्रति लीटर २.६१ रुपये तर डिझेलच्या दरात प्रति लीटर २.७१ रुपयांची मोठी वाढ करण्यात आली आहे. या नव्या वाढीमुळे देशातील अनेक शहरांमध्ये पेट्रोलच्या दराने अखेर शंभरी पार केली असून डिझेलनेही ९५ रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. यामुळे वाहतूक खर्च वाढण्याची आणि पर्यायाने इतर जीवनावश्यक वस्तूही महागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

राजधानी दिल्लीसह मुख्य शहरांमधील आजचे दर

या दरवाढीनंतर देशाची राजधानी दिल्लीत पेट्रोलचा दर ९९.५१ रुपयांवरून थेट १०२.१२ रुपये प्रति लीटरवर पोहोचला आहे. तर डिझेल ९२.४९ रुपयांवरून ९५.२० रुपये प्रति लीटर झाले आहे.

इतर मेट्रो शहरांचा विचार केला तर मुंबईत पेट्रोलचा दर १११.२१ रुपये आणि डिझेलचा दर ९७.८३ रुपये प्रति लीटर झाला आहे. कोलकात्यामध्ये पेट्रोल ११३.५१ रुपये तर डिझेल ९९.८२ रुपयांवर पोहोचले आहे. चेन्नईमध्ये पेट्रोल १०७.७७ रुपये आणि डिझेल ९९.९५ रुपये प्रति लीटर दराने विकले जात आहे.

१० दिवसांतील दरवाढीचा संपूर्ण आलेख

इंधनाचे दर सातत्याने वाढत असल्याने ग्राहकांचे बजेट कोलमडले आहे. याआधी अवघ्या दोन दिवसांपूर्वी म्हणजेच २३ मे रोजी पेट्रोल ९१ पैशांनी तर डिझेल ८६ पैशांनी महागले होते.

त्यापूर्वी पाच दिवस आधी म्हणजेच १९ मे रोजीही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात अनुक्रमे ८७ पैसे आणि ९१ पैशांची वाढ करण्यात आली होती. गेल्या १० दिवसांत लागोपाठ चार वेळा झालेल्या या दरवाढीमुळे जनतेमध्ये सरकारविरोधात तीव्र नाराजी पाहायला मिळत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lucky Zodiac Signs 2026: व्यापाऱ्यांसाठी जॅकपॉट अन् नोकरदारांना पगारवाढ! ऑगस्ट महिन्यात 'या' राशीची चांदीच चांदी; पैशांची चिंता कायमची मिटणार

Government Jobs: कर्मचारी भरती आयोगाकडून 3 हजार नोकऱ्या; आता आणखी 2 हजार पदांसाठी सरकार सज्ज, CM प्रमोद सावंतांची मोठी घोषणा

Bori Road Safety Issue: बोरीतील धोकादायक साकवाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष? कठडा तुटल्याने वाहनचालकांच्या जीवाला धोका, तातडीने दुरुस्तीची गरज

Garuda Lenka: राजासाठी जीव देण्याची शपथ, मृत्यूची बातमी मिळताच आत्मबलिदान; होयसळ साम्राज्याच्या ‘गरुड लेंका’ योद्ध्यांची रोमांचकारी गाथा

Viral News: आश्चर्य..! दोन तोंड अन् आठ पायांच्या वासराचा जन्म; तब्बल 5 तास चालली प्रसूतीची शस्त्रक्रिया Watch Video

SCROLL FOR NEXT