French President Emmanuel Macron visited Nizamuddin Dargah. Dainik Gomantak
देश

Viral Video: फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांची निजामुद्दीन दर्ग्याला भेट, कव्वालीच्या तालावर धरला ठेका

Emmanuel Macron: यावेळी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांचा शाल देऊन सन्मानही करण्यात आला. याशिवाय दर्ग्याच्या ७०० वर्षांच्या इतिहासाची त्यांना सविस्तर माहितीही देण्यात आली.

Ashutosh Masgaunde

French President Emmanuel Macron visited Nizamuddin Dargah:

फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी शुक्रवारी रात्री दिल्लीतील प्रसिद्ध दर्गा निजामुद्दीन औलिया येथे भेट दिली. सुमारे अर्धा तास तेथे थांबत तेथे सुरू असलेल्या कार्यक्रमांमध्ये त्यांनी सहभाग घेतला.

यावेळी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांचा शाल देऊन सन्मानही करण्यात आला. याशिवाय दर्ग्याच्या ७०० वर्षांच्या इतिहासाची त्यांना सविस्तर माहितीही देण्यात आली. त्याच्या अर्ध्या तासाच्या कार्यक्रमात इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासमोर कव्वालीही (Qawwali) सादर करण्यात आली, जी ऐकल्यानंतर ते खूप खुश झाले आणि नाचतानाही दिसले.

ही माहिती देताना अधिकाऱ्यांनी सांगितले की, मॅक्रॉन रात्री साडेदहाच्या सुमारास देशातील 700 वर्षे जुन्या सुफी संस्कृती केंद्रात पोहोचले. अर्ध्या तासाहून अधिक काळ ते येथे थांबले. राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन दर्ग्यात आयोजित कव्वालीदरम्यान नाचतानाही दिसले.

यावेळी त्यांच्यासोबत परराष्ट्र मंत्री एस जयशंकरही उपस्थित होते. दर्ग्यात इतरही अनेक अधिकारी उपस्थित होते. हा दर्गा प्रसिद्ध सुफी संत निजामुद्दीन औलिया आणि त्यांचे शिष्य अमीर खुसरो यांची कबर आहे.

वास्तविक, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन हे प्रजासत्ताक दिनी भारताचे प्रमुख पाहुणे होते. दिल्लीत कर्तव्य पथावर आयोजित 75 व्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यातही ते सहभागी झाले होते.

तत्पूर्वी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी इमॅन्युएल मॅक्रॉन यांचे राष्ट्रपती भवनात स्वागत केले. राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती मॅक्रॉन यांच्या सन्मानार्थ मेजवानीचे आयोजन करण्यात आले होते. येथील मेजवानीला उपस्थित राहिल्यानंतर त्यांनी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्यासोबत हजरत निजामुद्दीनच्या दर्ग्यात जाऊन कव्वालीचा आनंद घेतला.

शुक्रवार फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या भारत दौऱ्याचा शेवटचा दिवस होता. याआधी त्यांच्या भारत दौऱ्यावर ते प्रथम जयपूरला गेले, जिथे पंतप्रधान मोदींनी त्यांचे स्वागत केले. जयपूरमध्ये त्यांनी पीएम मोदींसोबत रोड शोही केला.

दुसऱ्या दिवशी, इमॅन्युएल मॅक्रॉन दिल्लीला आले, जिथे ते प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याला उपस्थित राहणार होते. मॅक्रॉन हे प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे होते. याठिकाणी कर्तव्य पथावरील विविध झलकांचाही आनंद लुटला.

शेवटी, निजामुद्दीन दर्ग्याला भेट दिल्यानंतर, राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन म्हणाले, "2018 मध्ये माझ्या भारत भेटीच्या 5 वर्षानंतर पुन्हा भारतात येणे ही अत्यंत आनंदाची बाब आहे. अशा कार्यक्रमाचा भाग बनून मला खूप आनंद होत आहे."

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News: महाराष्ट्रात मिळालेलं यश अभूतपूर्व सुलक्षणा सावंत यांची प्रतिक्रिया; जाणून घ्या गोव्यातील इतर घडामोडी

Viral Video IFFI Goa: 'मिसेस'साठी सान्याची घाई तर, लापता लेडिजच्या नितांशिने चाहत्यांना केलं खूश; इफ्फीतले खास व्हिडिओ

Goa Opinion: बँका आवळतात गोव्यातील लघू उद्योगांचा गळा

Goa CM: 'एक है तो सेफ है' म्हणत गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी महायुतीला दिल्या भव्य विजयाच्या शुभेच्छा

IFFI 2024: दरवर्षी एका तरी महान गोमंतकीयांची आठवण ‘इफ्फी’त व्हायला हवी! दिग्दर्शक बोरकर यांचे रोखठोक मत जाणून घ्या..

SCROLL FOR NEXT