"फायनलमध्ये भारताशी सामना झाला, तर काय करणार?" स्वतःच्याच बोर्डाविरोधात उभा ठाकला पाकिस्तानी खेळाडू, 'बॉयकॉट'वरून 'PCB'ला खडे बोल

Danish Kaneria on Pakistan boycott India: T20 विश्वचषक २०२६ मध्ये भारतांविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार टाकण्याच्या पाकिस्तान सरकारच्या आणि पीसीबीच्या (PCB) निर्णयामुळे क्रिकेट विश्वात खळबळ उडाली आहे.
Danish Kaneria on Pakistan boycott India
Danish Kaneria on Pakistan boycott IndiaDainik Gomantak
Published on
Updated on

T20 विश्वचषक २०२६ मध्ये भारतांविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार टाकण्याच्या पाकिस्तान सरकारच्या आणि पीसीबीच्या (PCB) निर्णयामुळे क्रिकेट विश्वात खळबळ उडाली आहे. या निर्णयामुळे पाकिस्तानवर आंतरराष्ट्रीय बंदीची टांगती तलवार असतानाच, आता पाकिस्तानच्या एका माजी क्रिकेटपटूने आपल्याच बोर्डाच्या या भूमिकेला 'अतार्किक' ठरवत घरचा आहेर दिला आहे. माजी फिरकीपटू दानिश कनेरियाने पाकिस्तानच्या या निर्णयाचा तीव्र निषेध करत, याचे गंभीर परिणाम पाकिस्तान क्रिकेटलाच भोगावे लागतील, असा इशारा दिला आहे.

फायनलमध्ये काय करणार?"

दानिश कनेरिया यांनी एका मुलाखतीत पीसीबीला आरसा दाखवला आहे. ते म्हणाले की, "पाकिस्तानने घेतलेला हा निर्णय पूर्णपणे चुकीचा आणि तर्कहीन आहे. जर तुम्ही गट फेरीत भारतासोबत खेळण्यास नकार दिलात आणि समजा सेमीफायनल किंवा फायनलमध्ये भारताशी सामना झाला, तर तुम्ही काय करणार? तुम्ही थेट विश्वचषकाची ट्रॉफी सोडून मायदेशी परतणार का?" कनेरियांच्या या सवालामुळे पीसीबीच्या दुटप्पी भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Danish Kaneria on Pakistan boycott India
Goa BJP: भाजपने कंबर कसली, विरोधी पक्षांचे अजून ठरेना; गोवा विधानसभा निवडणूकीचे बिगुल

भारताचे वर्चस्व

कनेरिया यांनी दोन्ही संघांमधील वाढत्या अंतरावरही भाष्य केले. "पाकिस्तानला वाटते की भारत-पाकिस्तान सामन्यातून खूप महसूल मिळतो, पण आता या दोन संघांमध्ये मैदानावर खरी स्पर्धा उरलेली नाही. भारताने पाकिस्तानला प्रत्येक स्तरावर पराभूत केले आहे, मग तो ५० षटकांचा विश्वचषक असो वा T२० विश्वचषक. पाकिस्तानचे खेळाडू स्वतःच्या खेळावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी अशा विवादास्पद निर्णयांना समर्थन देत आहेत," असेही कनेरियाने स्पष्टपणे मांडले.

Danish Kaneria on Pakistan boycott India
Dhirio In Goa: गोव्यात हे काय चाललंय? 4 ठिकाणी 'धीरयो' झाल्याची बातमी; सुरावलीत बैल उधळून एक जखमी झाल्याची चर्चा

आयसीसीची तातडीची बैठक आणि ५०० कोटींचा धोका

पाकिस्तानच्या या अधिकृत बहिष्काराच्या घोषणेनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) ४८ तासांच्या आत एक आणीबाणीची बोर्ड बैठक घेणार आहे. या बैठकीत पाकिस्तानच्या सदस्यत्वावर आणि त्यांना मिळणाऱ्या वार्षिक ५०० कोटी रुपयांच्या निधीवर चर्चा होण्याची शक्यता आहे. पाकिस्तानने बांगलादेशच्या मुद्द्यावरून हा वाद उकरून काढला असला तरी, बांगलादेश आधीच स्पर्धेतून बाहेर पडला आहे, हे कनेरिया यांनी आवर्जून सांगितले.

पाकिस्तानी क्रिकेटचे अस्तित्व धोक्यात

या निर्णयामुळे केवळ भारत-पाक सामना रद्द होणार नाही, तर पाकिस्तानला उर्वरित स्पर्धेतूनही बाहेर काढले जाऊ शकते. अशा परिस्थितीत पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची आर्थिक स्थिती कोलमडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. कनेरिया यांच्या मते, राजकीय इशाऱ्यांवरून चालणाऱ्या अशा निर्णयांनी पाकिस्तानच्या आगामी पिढीतील क्रिकेटपटूंचे भविष्य अंधारात जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com