Goa Accident: वळणावर दुचाकी घसरली अन् दोन्ही पाय तुटले, झुआरी पुलावर भयंकर अपघात! 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू

Zuari bridge accident: गोव्यातील नवीन झुआरी पुलावर रविवारी संध्याकाळी एक भीषण अपघात घडला.
Goa Accident
Goa AccidentDainik Gomantak
Published on
Updated on

गोव्यातील झुआरी उड्डाणपुलावर रविवारी संध्याकाळी एक भीषण अपघात घडला. वेगाने जाणारी मोटारसायकल भीषण वळणावर घसरल्याने झालेल्या या अपघातात २५ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताची भीषणता इतकी होती की, तरुणाने दोन्ही पाय गमावले आणि उपचारापूर्वीच त्याचा प्राण गेला. सर्वेश बोरकर (वय २५, रा. सावर्डे-कुडचडे) असे या दुर्दैवी तरुणाचे नाव आहे.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, सर्वेश बोरकर आपली मोटारसायकल (GA-05-K-6336) घेऊन कुडचडे येथून पणजीच्या दिशेने जात होता. रविवारी रात्री ७:२० च्या सुमारास झुआरी पुलावरील टोयोटा शोरूम ओलांडल्यानंतर एका तीव्र वळणावर त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले.

अतिवेगामुळे मोटारसायकल घसरली आणि सर्वेश रस्त्यावर फेकला गेला. तो रस्त्यावरून सुमारे १० ते १५ मीटर घासत गेला, तर त्याची मोटारसायकल तब्बल ४० ते ५० मीटर लांब जाऊन पडली.

Goa Accident
Goa Crime: गोवा हादरला! 'बिट्स पिलानी'त 20 वर्षीय विद्यार्थिनीनं गळफास घेत संपवलं जीवन, पोलिसांचा चहूबाजूंनी तपास

रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच मृत्यू

हा अपघात इतका भयानक होता की, रस्त्यावरील घर्षणामुळे सर्वेशचे दोन्ही पाय शरीरापासून वेगळे झाले. त्याला रक्ताळलेल्या अवस्थेत तत्काळ बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयात (GMC) नेण्यात आले. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्याने अखेरचा श्वास घेतला. जीएमसीतील आपत्कालीन विभागाने या घटनेची माहिती वेर्णा पोलिसांना दिली.

Goa Accident
Goa History: 1380 ते 1470 मध्ये संपूर्ण गोव्याची भरभराट झाली; विजयनगरचा प्रतापी सम्राट देवराय

वेर्णा पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, हा 'स्वयं-अपघात' आहे. या अपघातात इतर कोणत्याही वाहनाचा सहभाग नव्हता. पुलावरील त्या विशिष्ट वळणावर मोटारसायकलचा वेग मर्यादेपेक्षा जास्त असल्याने हा अपघात झाला असावा, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या घटनेमुळे सावर्डे-कुडचडे परिसरात शोककळा पसरली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com