Charles de Gaulle Photo Source - ANI
देश

Charles de Gaulle: फ्रान्सची शक्तिशाली युद्धनौका 'चार्ल्स डी गॉल' भारतात दाखल, गोव्याच्या किनाऱ्यावर नौसैनिक सरावात होणार सहभागी

Charles de Gaulle In Goa : फ्रान्सची अणुऊर्जेवर चालणारी विमानवाहू युद्धनौका ‘चार्ल्स डी गॉल’ सध्या भारतात दाखल झाली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी : फ्रान्सची अणुऊर्जेवर चालणारी विमानवाहू युद्धनौका ‘चार्ल्स डी गॉल’ सध्या भारतात दाखल झाली आहे. फ्रान्सच्या नौदलाच्या कॅरियर स्ट्राइक ग्रुपसोबत ही युद्धनौका हिंद महासागरात दाखल झालेली आहे.

ही युद्धनौका गोव्याच्या किनाऱ्यावर भारतीय नौदलासोबत नौसैनिक सरावात सहभागी होणार आहे. या सरावाचा मुख्य उद्देश समुद्री सुरक्षेला अधिक मजबूत करणे हा आहे. ‘चार्ल्स डी गॉल’ या युद्धनौकेवर नेहमीच राफेल फायटर जेट्स सज्ज असतात.

हिंद-प्रशांत महासागराच्या भागात चीनच्या हालचालींवर आळा घालण्यासाठी फ्रान्सकडून कॅरियर स्ट्राइक ग्रुप या भागात पाठवला आहे. हा ग्रुप फ्रान्सच्या ‘क्लेमेन्सो 25 मिशन’चा भाग आहे. भारत आणि फ्रान्समधील नौदल सहकार्य वाढवण्यासाठी हे पाऊल महत्त्वाचे ठरणार आहे.

भारतातील फ्रान्सच्या दूतावासाने सांगितलं की, भारतीय नौदलासोबत होणाऱ्या या सरावादरम्यान, दोन्ही देशांचे सैनिक परस्परांच्या विमानवाहू युद्धनौकांवर काम करण्याचा अनुभव घेतील.

या नौदल हवाई प्रशिक्षणाचे उद्दिष्ट दोन नौदलांमधील आंतर-कार्यक्षमता विकसित करणे आणि हवाई, पृष्ठभाग आणि पाणबुडी क्षेत्रातील बहु-पर्यावरणीय धोक्यांना तोंड देण्यासाठी क्रू तयार करणे हा आहे.

भारत-फ्रान्स रणनीतिक भागीदारी

भारतातील फ्रान्सच्या दूतावासाने सांगितलं की, फ्रान्सने 1998 पासून भारताचा सर्वात जवळचा रणनीतिक भागीदार म्हणून ओळखला जातो. भारत आणि फ्रान्समधील ही भागीदारी केवळ संरक्षणापुरती मर्यादित नाही, तर हिंद-प्रशांत क्षेत्रात शांतता प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने मोठे पाऊल ठरत आहे.

फ्रेंच नौदलाने म्हटले आहे की, “भारतीय नौदलासोबत होणाऱ्या या सरावादरम्यान, दोन्ही देशांचे सैनिक परस्परांच्या विमानवाहू युद्धनौकांवर काम करण्याचा अनुभव घेतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'ऑर्डर उशिरा का आणली?' म्हणत डिलिव्हरी बॉयला फ्लॅटमध्ये खेचून मारहाण, तीन मिनिटांचा CCTV व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! पगार किती वाढणार? फिटमेंट फॅक्टर किती असेल? 5 महत्त्वाचे अपडेट्स आले समोर

Rishabh Pant Record: गिलख्रिस्टचा वर्ल्ड रेकॉर्ड उद्ध्वस्त! ऋषभ पंत बनला 'सिक्सर किंग', परदेशात 'अशी' कामगिरी करणारा ठरला पहिलाच खेळाडू

Investment Fraud: भरघोस परताव्याचं स्वप्न दाखवलं अन् 85.5 लाखांवर डल्ला! शिवोलीतील महिलेची फसवणूक, मुंबईतील दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल

AUS vs BAN: क्रिकेटविश्वात मोठा उलटफेर! बांगलादेशनं बलाढ्य ऑस्ट्रेलियाला 9 विकेट्सनं लोळवलं, 30 मिनिटांत कांगारूंचा खेळ खल्लास Watch Video

SCROLL FOR NEXT