Goan Sea Food: 'सी फूड' लव्हर आहात? मग 'गोव्या'तील या ठिकाणांना नक्कीच भेट द्या

गोमन्तक डिजिटल टीम

विनायक फॅमिली रेस्टॉरंट, आसगाव

सीफूड, व्हेज साइड्स, थाळी, बटर लसूण कोळंबी, स्क्विड, क्लॅम्स हे पदार्थ इथे खास मिळतात. चवीच्या सातत्यामुळे हे रेस्टॉरंट खवय्यांच्या पसंतीस उतरले आहे.

 सूझा लोबो, कळंगुट

सीफूडसाठी हे रेस्टॉरंट पहिल्या यादीत घ्या. प्रॉन रेचेडो , शेझवान सॉसमधील मांस, तळलेले मासे, कोळंबीचे पदार्थ खाण्यासाठी इथे गर्दी होते.

शारदा बार, मडगाव

या जागी विविध प्रकारचे समुद्री खाद्यपदार्थ जसे की कालवे फ्राय, ड्रमस्टिक प्रॉन करी, फिश थाली, किंगफिश थाली आणि स्क्विड बटर फ्राय अगदी पारंपारिक चवीचे मिळतात.

ओ कोक्वेरा, पर्वरी

तुम्ही इथे चिकन कॅफेरियलचा आस्वाद घेतलात तर तुमचा दिवस खास होऊन जाईल. सोबत स्पेशल मसाल्यातील डिशेस तुम्हाला गोवन चवीत खिळवून ठेवतील.

भूमिपुत्र रेस्टॉरंट, पेरनेम

ही सर्वात मोठी फिश थाली आहे. मसाल्यांची चव आणि गरमागरम जेवण ही इथली खासियत आहे.

फॅट फिश, कलंगुट

या भोजनालयात मिळणारे विविध प्रकारचे मासे, लॉबस्टर, स्क्विड, खेकडे , फिंगर फूड, फॅट फिश तुमच्या बकेट लिस्टमध्ये नक्की पाहिजेतच.

सीफूड जंक्शन, कळंगुट

ताजे खेकडे, मॅरीनेट केलेले स्क्विडची प्लेट इथे तुमचे स्वागत करते. तंदूरी पदार्थ आणि चायनीज फ्यूजन स्नॅक्स तुमच्या आवडत्या मॉकटेल्ससह इथे मिळेल.

मार्टिन कॉर्नर, बेतालबाटी

इथे सॉरपोटेल, गोवा सॉसेज, ब्रेड आणि मीट चिली फ्राय सर्व्ह केल्यावर तुम्ही नजर हलवू शकणार नाही. इथल्या तंदूर फ्राय डिशेस अजिबात चुकवू नका.

आनंददायी आहे गोव्याची सफर! सोबत घ्या 'हा' अनुभव..