केंद्र सरकारच्या वतीने देशातील महिलांना मोफत शिलाई मशीन (Free Sewing Machine) दिली जात आहे. प्रत्येक राज्यातील पन्नास हजार महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. महिलांना आर्थिक सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून नरेंद्र मोदी सरकारने (Narendra Modi Government) हा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. 2022 या वर्षासाठी वीस ते चाळीस वयोगटातील महिलांना मोफत शिलाई मशीनसाठी अर्ज करता येईल. या योजनेत गाव आणि शहरांचा समावेश करण्यात आला आहे.
योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील कागपत्रे आवश्यक (Essential Documents)
मोफत शिलाई मशीनचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला आधार कार्ड, जन्मतारखेचा पुरावा, उत्पन्नाचा दाखला, मोबाईल क्रमांक, पासपोर्ट आकाराचा फोटो, अंपगासाठी अद्वितीय अपंगत्व ओळखपत्र आणि विधवा महिलांसाठी विधवा प्रमाणपत्र आवश्यक आहे.
असा करा अर्ज (How to Apply)
www.india.gov.in या संकेस्थळाला भेट द्या
होम पेजवर मोफत शिवनकाम मशीन या अर्जाची लिंक उघडा
अर्जाचा पीडीएफ दिसेल तो डाऊनलोड करून, प्रिंट काढा
अर्जाचा तपशील भरून, त्याला वरील कागदपत्रे जोडा व सबमिट करा
(नाव, वडील/पतीचे नाव, जन्मतारीख आणि इतर माहिती यासारख्या सर्व तपशीलांचा उल्लेख त्यामध्ये करा). सर्व माहिती भरल्यानंतर, तुम्हाला तुमच्या अर्जासोबत फोटोकॉपी जोडून तुमची सर्व कागदपत्रे संबंधित कार्यालयात द्यावी लागतील.
अर्ज जमा केल्यानंतर सरकारकडून अर्जाची छाननी केली जाईल. तपासणी झाल्यानंतर तुम्हाला मशीन दिले जाईल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.