केंद्रीय मंत्रीपदी वर्णी लागलेले 4 खासदार Dainik Gomantak
देश

महाराष्ट्रातुन केंद्रीय मंत्रीपदी वर्णी लागलेले 4 खासदारांची पार्श्वभुमी काय ?

महाराष्ट्रातुन केंद्रीय मंत्री पदासाठी निवड झालेल्या या चारही खासदारांची थोडक्यात ओळख

दैनिक गोमन्तक

मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्मचा पहीलाच मंत्री मंडळ विस्ताराचा शपथविधी सोहळा आज दिल्लीत पार पडला. विशेष म्हणजे या मंत्रीमंडळ विस्तारात महाराष्ट्राच्या 4 नेत्यांना स्थान मिळाले आहे. यामध्ये नारायण राणे, कपील पाटील, भारती पवार आणि भागवत कराड या महाराष्ट्रातील नेत्यांचा समावेश आहे. तर इतर एकूण 43 नेत्यांनी केंद्रीय मंत्रीपदाची आज शपथ घेतली. (Four MPs from Maharashtra who became Union Ministers)

महाराष्ट्रातुन केंद्रीय मंत्री पदासाठी निवड झालेल्या या चारही खासदारांचा प्रवास आपण थोडक्यात जाणुन घेऊ.

नारायण राणे

1) नारायण राणे

साधारणत: दिड वर्षांपुर्वी कॉंग्रेसमधुन भारतीय जनता पक्षात गेलेले नारायण राणे हे महाराष्ट्रातील त्या राजकीय नेत्यांपैकी एक आहेत, जे सत्ता असताना आणि नसतानाही नेहमीच चर्चेत असतात. मुळ मुंबईतील घाटला गावातील रहिवासी असलेल्या नारायण राणेंचा प्रवास शिवसेनेच्या शाखा प्रमुख पदापासुन सुरु झाला होता. मातोश्री आणि बाळासाहेब ठाकरेंशी असलेली जवळीक या जोरावर त्यांच्या राजकीय प्रवासाने वेग घेतला. त्यानंतर नगरसेवक, बेस्ट महामंडळाचा अध्यक्ष, आमदार आणि मग मुख्यमंत्री पदापर्यंत आल्यानंतर राणेंनी कॉंग्रेस मध्ये प्रवेश केला.आणि त्यानंतर आता भारतीय जनता पक्षात जात त्यांनी आज केंद्रीय मंत्रीपद मिळवल.

भागवत कराड

2) भागवत कराड

मुळ लातुरचे असणारे भागवत कराड यांना काही महिन्यांपुर्वीच भारतीय जनता पक्षाने राज्यसभेचे खासदार म्हणुन संधी दिली आहे. त्यानंतर लगेचच त्यांची केंद्रीय मंत्री मंडळात वर्णी लागते ही बाब विशेष आहे. मात्र त्यांची ही निवड मुंडे परिवाराला डावलण्यासाठी झाली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. भागवत कराड हे ओबीसी समाजातील चेहरा असुन पंकजा मुंडे यांच्यावर कुरघोडी केल्याचेही बोलले जाते आहे.

कपील पाटील

3) कपील पाटील

केंद्रीय मंत्रीपदी वर्णी लागलेल्या 4 खासदारांपैकी एक म्हणजे भिवंडी मतदार संघाचे खासदार कपील पाटील हे देखील राष्ट्रवादी मधुन भारतीय जनता पक्षात आले आहेत. भारतीय जनता पक्षाचे नेते आणि महाराष्ट्र राज्याचे विरोधीपक्षनेचे देवेंद्र फडणवीस यांचे ते निकटवर्तीय आहेत. 1988 साली ते दिवे अंजुर येथील ग्रामपंचायतीचे सरपंच म्हणुन त्यांचा प्रवास सुरु झाला होता.

भारती पवार



4) भारती पवार

नाशिकच्या दिंडोरी मतदार संघाच्या खासदार असलेल्या भारती पवार यादेखील 2018 साली भारतीय जनता पक्षात आल्या होत्या. मंत्री मंडळ विस्तारात महाराष्ट्रातुन एकून 4 खासदारांपैकी भारती पवार या एकमेव महिला खासदार आहेत. पेशाने डॉक्टर असलेल्या भारती पवार या आमदार ए.टी. पवार यांच्या सुन आहेत. दिंडोरी मतदारसंघात त्यांचा दांडगा संपर्क असल्याचे पहायला मिळते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT