देश

Amrinder Singh Joins BJP: पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांचा भाजपात प्रवेश

पंजाब लोक काँग्रेस हा आपला पक्षही केला विलीन

गोमन्तक डिजिटल टीम

पंजाबचे माजी मुख्यमंत्री आणि पंजाब लोक काँग्रेसचे (PLC) प्रमुख कॅप्टन अमरिंदर सिंह (Captain Amrinder Singh) यांनी सोमवारी भाजपमध्ये प्रवेश केला. काँग्रेसमधून बाहेर पडल्यावर त्यांनी स्थापन केलेला आपला पक्ष पंजाब लोक काँग्रेस (PLC) देखील भाजपमध्ये विलीन केला आहे. कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्या भाजप प्रेवशावेळी केंद्रीय मंत्री नरेंद्र तोमर आणि किरेन रिजिजू उपस्थित होते.

कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी काही दिवसांपूर्वी पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Home Minister Amit Shah) यांची भेट घेतली होती. त्याचवेळी ते भाजपमध्ये प्रवेश करतील अशी चर्चा रंगली होती. अखेर आज त्या चर्चेवर पडदा पडला असून, कॅप्टन अमरिंदर सिंह आपल्या पक्षासह भाजपमध्ये सामिल झाले आहेत.

अमरिंदर सिंह यांच्या प्रवेशावेळी बोलताना केंद्रीय मंत्री नरेंद्र तोमर म्हणाले की, 'पीएलसीचे भाजपमध्ये विलीनीकरण झाल्यामुळे पक्ष मजबूत होईल. कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी नेहमीच सर्वात आधी प्राधान्य दिले आहे. भाजपच्या लाखो कार्यकर्त्यांच्या वतीने त्यांचे आणि त्यांच्या समर्थकांचे स्वागत करताना मला आनंद होत आहे.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mohammed Siraj Record: सिराजने मोडला बुमराहचा विक्रम! 29 वर्षांनंतर 'अशी' कामगिरी करणारा ठरला पहिला आशियाई खेळाडू

Goa News Live Update: आग्वाद येथे दोघांवर चाकू आणि कात्रीने हल्ला; तामिळनाडूच्या पाच जणांना अटक

Goa Politics: खरी कुजबुज; धीरयोमागे स्वार्थ?

"मानकुरादची नवी कलमे लावा, उत्‍पन्न वाढवा", CM सावंतांचं शेतकऱ्यांना आवाहन; प्रतिहेक्‍टर मिळतंय 2 लाख रुपयांचे अनुदान

Goa Assembly: 'किनारी भागात भटकी कुत्री, जनावरांवर निर्बंध आणा', जीत आरोलकरांची मागणी

SCROLL FOR NEXT