आशिया चषकात (Asia Cup) भारतीय संघ खराब कामगिरीमुळे बाहेर पडला. आणि पाकिस्तानला नमवत श्रीलंका संघाने आशिया चषकावर आपले नाव कोरले. थोड्याच दिवसांवर T20 विश्वचषक (T20 World Cup) देखील येऊन ठेपला आहे. यासाठी जगभरातील सर्वच संघ तयारीला लागले आहेत. तत्पुर्वी भारतीय संघ आणि ऑस्ट्रेलिया संघात तीन T20 सामने (Ind vs Aus T20 series) होत आहेत. दोन्ही संघासाठी T20 विश्वचषकापूर्वी ही मालिका लिटमस टेस्ट मानली जात आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया मधील पहिला T20 सामना मंगळवारी (दि.20) खेळला जाईल. मोहाली येथील बिंद्रा मैदानावर सायंकाळी 7:30 वाजता हा सामना सुरू होईल.
असे आहे मालिकेचे वेळापत्रक
20 सप्टेंबर - पहिली T20 (मोहाली)
23 सप्टेंबर - दुसरी T20 (नागपूर)
25 सप्टेंबर - तिसरी T20 (हैद्राबाद)
(सर्व सामन्यांची वेळ सायंकाळी 7:30 वाजता)
कुठे पाहता येईल सामना
स्टार स्पोर्टस्, हॉटस्टार, डिस्ने प्लस
भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार) के.एल राहुल (उप-कर्णधार), विराट कोहली. सूर्यकुमार यादव, दीपक हुड्डा, रिषभ पंत (यष्टीरक्षक), दीनेश कार्तिक (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, रविचंद्रन आश्विन, यजुवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, उमेश यादव, हर्षल पटेल, दीपक चहर, जसप्रीत बुमराह
ऑस्ट्रियाचा संघ
अॅरॉन फिंच (कर्णधार), सीन अबॉट, अश्टॉन अगर, पॅट कमिन्स, टिम डेव्हिड, नॅथन ईल्स, कॅमरून ग्रीन्स, जोश हेजलवुड, जोश इंग्लिस, ग्लेन मॅक्सवेल, केन रिचर्डसन्, डॅनियल सॅम्स, स्टिव्ह स्मिथ, मॅथ्यु वेड, अॅडम झाम्पा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.