Jitan Ram Manjhi Dainik Gomantak
देश

"मी राम मानत नाही, राम देव नाही"; बिहारच्या माजी मुख्यमंत्र्यांचं वादग्रस्त वक्तव्य

बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतन राम मांझी (Jitan Ram Manjhi) हे वादग्रस्त वक्तव्यामुळे सतत चर्चेत असतात.

दैनिक गोमन्तक

पाटणा : बिहारचे (Bihar) माजी मुख्यमंत्री जीतन राम मांझी (Jitan Ram Manjhi) हे वादग्रस्त वक्तव्यामुळे सतत चर्चेत असतात. जमुई जिल्ह्यातील सिकंदरामध्ये आंबेडकर जयंतीला उपस्थित राहण्यासाठी आलेल्या मांझी यांनी लोकांना संबोधित करताना भगवान रामावर प्रश्न उपस्थित केले. (Former Bihar Chief Minister Jeetan Ram Manjhi has made a controversial statement about Lord Rama)

ते म्हणाले की, 'राम हा देव नाही. रामायण लिहिणाऱ्या वाल्मिकी आणि तुलसीदासांवर माझा विश्वास आहे, परंतु मी रामाला मान नाही.' इथेच न थांबता ते पुढे म्हणाले की, भगवान राम तुलसीदास आणि वाल्मिकींच्या रामायणाचे पात्र होते. सोहळ्याला संबोधित करताना ते म्हणाले की, 'पूजा करुन कोणी मोठा होत नाही.' ते पुढे म्हणाले की, 'अनुसूचित जातीच्या लोकांनी पूजा करणे बंद करावे.'

दरम्यान, ब्राह्मणांवर निशाणा साधत ते म्हणाले की, ''जे ब्राह्मण मांस आणि दारु पितात, ते खोटे बोलतात. अशा ब्राह्मणांपासून दूर राहावे. त्यांची पूजा करु नये. तुम्ही लोक पूजा करणे बंद करा.'' ते पुढे म्हणाले की, ''रामाने शबरीची खोटी बेरी खाल्ली होती. सिकंदरामधील हम पक्षाचे आमदार प्रफुल्ल मांझी यांनी आंबेडकर जयंतीनिमित्त हा कार्यक्रम आयोजित केला होता.''

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'बर्च' प्रकरणाचा सस्पेन्स कायम! पोलिसांना निवडणूक ड्युटी; अजय गुप्ताच्या जामिनावर फैसला सोमवारी

Goa ZP Election: "आम्हाला एकही उमेदवार नको असेल तर?" बॅलेट पेपरवर 'नोटा'चा पर्याय नाही; सुर्ल साखळीतील मतदारांची नाराजी

Salt Production Goa: गोव्यात एकेकाळी 75 पेक्षा अधिक मिठागरे होती, 130 प्रकारची मिठे होती; गोमंतकीयांची खरी चव नष्ट होत चालली आहे

Goa Crime: 2024 साली संपला व्हिसा, तरी गोव्यात भाड्याच्या खोलीत मुक्काम; 2 परदेशी नागरिकांची न्यायालयीन कोठडीत रवानगी

Goa ZP Election 2025 Live Update: तिन्ही उमेदवारांच्या विजयाबद्दल 'ढवळीकरांना' खात्री

SCROLL FOR NEXT