Nikhat Ansari Dainik Gomantak
देश

माफिया डॉन मुख्तार अन्सारीची सून निखतच्या iphone मध्ये सापडले विदेशी नंबर; पोलिसांनी केली 8 तास चौकशी

उत्तर प्रदेश एसआयटी, एसटीएफ आणि सायबर पथकांनी चौकशी केली.

Pramod Yadav

सुहेलदेव भारतीय समाज पक्षाचे (सुभासपा) आमदार अब्बास अन्सारी यांची पत्नी आणि माफिया डॉन मुख्तार अन्सारीची सून निखत बानो तसेच, त्यांच्या ड्रायव्हरची पोलीस चौकशी सुरू आहे. दोघांची दुसऱ्या दिवशी 8 तास चौकशी करण्यात आली.

चौकशीदरम्यान पोलीस लाईन चित्रकूटमध्ये कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

उत्तर प्रदेश एसआयटी, एसटीएफ आणि सायबर पथकांनी चौकशी केली. सीडीआर अहवालाच्या आधारे पोलिसांच्या पथकांनी निखतकडून विदेशी मोबाइल क्रमांकांची माहिती घेतली.

निखत बानोच्या रिमांडचा आज शेवटचा दिवस आहे, तर तिचा ड्रायव्हर नियाज अहमदचा 5 दिवसांचा रिमांड मंगळवारपर्यंत सुरू राहणार आहे. 17 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता दोघांचा रिमांड कालावधी सुरू झाला.

माफिया-राजकारणी मुख्तार अन्सारी यांचा मुलगा आणि सुहेलदेव भारतीय समाज पक्षाचे आमदार अब्बास अन्सारी हे मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात गेल्या तीन महिन्यांपासून चित्रकूट तुरुंगात बंद होते. या प्रकरणानंतर त्याची रवानगी आता उत्तर प्रदेशातील कसंगज कारागृहात करण्यात आली आहे.

नेमकं प्रकरण काय?

निकत बानो यांची पत्नी बेकायदेशीरपणे आमदार अब्बास अन्सारी यांना भेटण्यासाठी चित्रकूट तुरुंगात जात असे. चित्रकूट कारागृहातील डेप्युटी जेलरच्या खोलीत पतीला बेकायदेशीरपणे भेटल्याबद्दल निकतला 10 फेब्रुवारीला अटक करण्यात आली होती. पोलिसांनी सांगितले होते की, निखतकडून दोन मोबाईल फोन्सशिवाय विदेशी चलन आणि अनेक आक्षेपार्ह वस्तू जप्त केल्या आहेत.

चित्रकूट रगौली कारागृहाचे प्रभारी एएसआय श्यामदेव सिंग यांच्या तक्रारीवरून तुरुंग अधीक्षक अशोक कुमार सागर, डेप्युटी जेलर, एक हवालदार, अब्बासची पत्नी निखत आणि त्याचा ड्रायव्हर नियाज अहमद यांच्यावर गुन्हेगारी कट आणि पुराव्यांशी छेडछाड यासह अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. या आरोपावरून गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी कारागृह अधीक्षक व अन्य सात कर्मचाऱ्यांना निलंबित करून त्यांच्यावर विभागीय कारवाई सुरू करण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Railway Diwali Bonus 2026: मोदी सरकारची रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, 10 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार बंपर बोनस; अखेर कॅबिनेटचा शिक्कामोर्तब

नाशिकच्या पाण्यत आढळले कर्करोगास कारणीभूत ठरणारे जीवघेणे रसायन; पर्यावरण संस्थेच्या अहवालात मोठा खुलासा

Farmers Drought Financial Relief: पावसाने हुलकावणी दिली पण सरकार धावून आले! दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना 'इतक्या' हजारांची मदत जाहीर; वाचा ताजी अपडेट

Unlucky Zodiac Signs: पैशांची घ्या काळजी! शुक्र अस्तामुळे 'या' 4 राशींना बसू शकतो मोठा आर्थिक फटका; पुढील 14 दिवस अत्यंत कसोटीचे

Goa Under 23 Cricket: गोव्याच्या युवा क्रिकेटपटूंचा बडोद्यावर दबदबा! 158 धावांची आघाडी, मोठ्या आघाडीची संधी

SCROLL FOR NEXT