Agartala: भारतात घुसण्याचा प्रयत्न, 10 रोहिंग्यांसह 16 जणांना अटक

आरपीएफने तीन मुलांसह एकूण 16 जणांना स्टेशनवरून ताब्यात घेतले आहे.
 Arrested
Arrested Dainik Gomantak
Published on
Updated on

बेकायदेशीरपणे भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न करणाऱ्या 10 रोहिंग्यांसह 16 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. आगरतळा रेल्वे स्थानकावर रेल्वे पोलीस दलाने (RPF) ही कारवाई केली. रेल्वे अधिकाऱ्यांनी रविवारी याबाबत माहिती दिली.

10 रोहिंग्यांसह 16 जणांना बेकायदेशीरपणे भारतात प्रवेश केल्याच्या आरोपावरून ताब्यात घेतले आहे.

(16 Detained In Tripura, Including 10 Rohingya, For Illegally Entering India)

गव्हर्नमेंट रेल्वे पोलिस (जीआरपी) स्टेशन प्रभारी राणा चटर्जी यांनी याबाबत एका वृत्तवाहिनीला माहिती दिली आहे. रेल्वे पोलीस दलाला मिळालेल्या माहितीनुसार, आरपीएफने तीन मुलांसह एकूण 16 जणांना स्टेशनवरून ताब्यात घेतले आहे. यामध्ये 12 परदेशी नागरिक, दोन बांगलादेशी आणि 10 रोहिंग्या आहेत.

ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींमध्ये मधुपूर येथील अभिजीत देब नावाच्या एका एजंटचाही समावेश आहे.

 Arrested
Seafood: कतार सरकारचा मोठा निर्णय, भारतातून सीफूड निर्यातीचा मार्ग मोकळा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे सर्वजण बांगलादेशातून अवैधरित्या भारतात येत होते. आगरतळा रेल्वे स्थानकातून सकाळी 8.05 वाजता कंचनजंगा एक्स्प्रेसने सर्वजण कोलकात्याला जाणार होते.

आरोपींना न्यायालयात हजर करण्यापूर्वी वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले. त्यांच्यावर विशेष गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. पोलीस आरोपींची कसून चौकशी करत त्यांच्या अवैध पद्धतीने घुसखोरीचा मार्ग शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com