Floods in West Bengal Mamata Banerjee speaks with Narendra Modi  Dainik Gomantak
देश

पश्चिम बंगालमध्ये पावसाचे थैमान, मोदींचा दीदींना फोन

पश्चिम बंगालमध्ये सतत कोसळणाऱ्या पावसाने(West Bengal Heavy Rain) आणि त्यामुळे आलेल्या पुरामुळे(Floods In West Bengal) प्रचंड हाहाकार माजवला आहे.

दैनिक गोमन्तक

पश्चिम बंगालमध्ये सतत कोसळणाऱ्या पावसाने(West Bengal Heavy Rain) आणि त्यामुळे आलेल्या पुरामुळे(Floods In West Bengal) प्रचंड हाहाकार माजवला आहे. पावसाने आणि पुराने जवळपास 16 लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. दामोदर व्हॅली कॉर्पोरेशन धरणांमधून पाणी सोडल्यानंतर राज्यातील सहा जिल्ह्यांमधील किमान 3 लाख लोक प्रभावित झाले आहेत. आणि घरे विस्थापित झाले. पूर परिस्थितीची माहिती घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी(Prime Minister Narendra Modi) आज सकाळी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी(Chief Minister Mamata Banerjee) यांना फोन करून संपूर्ण परिस्थितीची माहिती घेतली आणि सर्व शक्य मदतीचे आश्वासनही दिले आहे. डीव्हीसीच्या धरणातून पाणी सोडल्याबद्दल ममता बॅनर्जी यांनी पीएम मोदींकडे तक्रार केली आहे. (Floods in West Bengal Mamata Banerjee speaks with Narendra Modi)

राज्यात सतत पडणाऱ्या पावसामुळे आलेल्या पूर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी स्वत: बाधित भागाचा दौरा करणार आहेत. त्या बुधवारी हुगळीत असणार होत्या. त्यांना हेलिकॉप्टरने क्षेत्राचे सर्वेक्षण करायचे होते, परंतु खराब हवामानामुळे त्या बहुधा रस्त्यानेच सर्वेक्षण करनार आहेत .

सूत्रांच्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी ममता बॅनर्जी यांना पंतप्रधान मोदींचा फोन आला होता पण काही कारणामुळे मुख्यमंत्र्यांशी संपर्क होऊ शकला नाही. नंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मोदींना फोन केला. यानंतर त्यांनी काही काळ दोन्ही नेत्यांमध्ये राज्यातील सध्याच्या परिस्थितीबाबत चर्चा झाली. डीव्हीसीने पाणी सोडल्यामुळे राज्यातील अनेक भाग पाण्याखाली गेले आहेत. म्हणूनच आज ममता बॅनर्जींनी पीएम मोदींकडे डीव्हीसीने पाणी सोडल्याबद्दल तक्रार केली.दुसरीकडे, मोदींना हे जाणून घ्यायचे होते की राज्यातील पूर परिस्थिती कशी आहे? तसेच आपत्तीला तोंड देण्यासाठी त्यांनी मदतीचे आश्वासनही दिले आहे.

तर दुसरीकडे, बंगालच्या विविध जिल्ह्यांमध्ये पूर परिस्थितीमध्ये पुन्हा मुसळधार पावसाची शक्यता आहे. हवामान खात्याकडून मिळालेल्या माहितीनुसार दक्षिण बंगालच्या विविध जिल्ह्यात पुन्हा मुसळधार पाऊस सुरू होऊ शकतो. असे झाल्यास तेथील पूर परिस्थिती अधिक भयावह रूप धारण करेल. दक्षिणेबरोबरच उत्तर बंगालमध्येही मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Free Train To Konkan: चाकरमान्यांका बाप्पा पावलो! गणेशोत्सवात दादर ते कुडाळ करता येणार 'मोफत प्रवास', एका कॉलवर करा बुकिंग

Goa Assembly Session: समुद्रकिनाऱ्यांवरून बेकायदेशीर दलाल आणि मार्गदर्शकांना हटवा

IND vs ENG: फक्त 'इतकं' करा आणि 2 विक्रम मोडा! ओव्हलमध्ये घडणार मोठा करिष्मा; भारत-इंग्लंड मिळून मोडणार 70 वर्ष जुना वर्ल्ड रेकॉर्ड

पाहावं ते नवलचं! पक्ष्याचा 'मन की बात' मध्ये सहभाग, गोव्याच्या पर्यटन मंत्र्याच्या बसला खांद्यावर; Watch Video

Supriya Sule: गोवा मुक्ती, 1972 चे युद्ध... सुप्रिया सुळेंनी संसदेत नेहरु, इंदिरांचा इतिहासच काढला; तेजस्वी सूर्यांना दिले कडक उत्तर

SCROLL FOR NEXT