Har Ghar Tiranga Dainik Gomantak
देश

Har Ghar Tiranga: तुमच्याकडच्या ध्वजाचं काय कराल? Indian Oilने काढला उत्तम मार्ग

दैनिक गोमन्तक

Flag Collection Drive: या वर्षी भारत स्वातंत्र्याचा 75 वा वर्धापन दिन साजरा करत आहे. 15 ऑगस्ट म्हणजेच स्वातंत्र्यदिनाची जनतेने जोरदार तयारी केली होकी. मोदी सरकारने राबवलेल्या 'हर घर तिरंगा अभियान' (Har Ghar Tiranga) या मोहिमेअंतर्गत प्रत्येक घरी राष्ट्रधअव लावण्यात आला होता.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत सरकारने स्वातंत्र्यदिन विशेष पध्दतिने साजरा करण्यासाठी 'हर घर तिरंगा' मोहीम राबवली होती. आणि जनतेने या मोहिमेला चांगला प्रतिसाद दिला होता. मात्र आता घरावर लावलेला राष्ट्रध्वज ठेवायचा कुठे? हा प्रश्न अनेकांना पडला आहे.

स्वातंत्र्याचा अमृत मोहोत्व साजरा करतांना आपण घरोघरी तिरंगा लावला. पण काल घरोघरी लावलेल्या ध्वजाचं करायचं काय? या शंकेचं समाधान करण्यासाठी इंडियन ऑईल कंपनीने पुढाकार घेतला आहे. इंडियन ऑईल कॉर्पोरेश कडून फ्लॅग कलेक्शन मोहिम राबवली जात आहे. तुमच्याकडे असलेला ध्वज तुम्ही इंडियन ऑईलच्या पेट्रोल पंपावर जमा करू शकता. इंडियन ऑईलच्या मुंबई डिव्हिजनने हा निर्णय घेतला आहे.

कंपनीने जनतेल्या आवाहन केले आहे की, 'तुमच्याकडे असलेले राष्ट्रध्वज तुम्ही जवळच्या पेट्रोल पंपावर जमा करा, जे चांगले ध्वज आहे ते आम्ही जमा करून घेऊ.' त्याचबरोबर वाऱ्यामुळे, पाण्यामुळे जे ध्वज डॅमेज झाले आहेत ते ध्वजही कंपनीकडे जमा करता येणार आहे.

'हर घर तिरंगा' मोहिमेअंतर्गत, सरकारने 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत सर्व लोकांना त्यांच्या घरावर किंवा प्रतिष्ठानांवर तिरंगा फडकवण्याचे आवाहन केले होते. राष्ट्रीय वीरांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी 'हर घर तिरंगा' मोहिमेचा एक भाग म्हणून लोकांनी घरोघरी राष्ट्रध्वज लावले होते. केंद्र सरकारने राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना या साठी आवाहन केले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rashi Bhavishya 18 October 2024: उत्तम द्रव्यलाभ होईल, व्यावसायिकांसाठी आजचा दिवस आशादायी

Ponda: बहिणीने धाडस केले पण भाऊ बचावला नाही; 17 तासानंतर आढळला दर्शन नार्वेकरचा मृतदेह

मेरशीत एक महिन्यापासून उभ्या जीपमध्ये आढळला मृतदेह, परिसरात खळबळ; गोव्यातील ठळक बातम्या

Goa Belgaum Highway: गोवा-बेळगाव महामार्गावरील वाहतूक ठप्प, दोन्ही बाजूला 4-5 किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा

Divar Island: पाचव्या शतकातील निर्मिती प्रक्रिया वापरुन गोव्यात उभारलं जातंय जहाज; पुढल्या वर्षी करणार गुजरात ते मस्कत प्रवास

SCROLL FOR NEXT