देश

'जातीवादी शब्द आणि जीवे मारण्याची धमकी'; प्रियंका गांधींच्या पीएवर अभिनेत्रीने केले गंभीर आरोप

स्वीय सहाय्यक संदीप सिंह याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Pramod Yadav

FIR filed against Priyanka Gandhi's PA: बिग बॉस-16 ची टॉप-5 फायनलिस्ट अर्चना गौतमच्या वडिलांनी काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी वाड्रा यांच्या स्वीय सहाय्यकावर (PA) त्यांच्या मुलीला जातीवादी शब्द बोलणे आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप केला आहे.

याप्रकरणी स्वीय सहाय्यक संदीप सिंह (Sandeep Singh) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. उत्तर प्रदेशातील मेरठमधील परतापूर पोलिस ठाण्यात ही तक्रार दाखल करण्यात आली आहे.

मेरठ पोलिसांनी गुन्हेगारी धमकी आणि एससी/एसटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. अर्चना गौतमने फेसबुक लाईव्हमध्ये (Facebook Live) या घटनेबद्दल सविस्तर माहिती दिली आहे.

अर्चना प्रियंका गांधी यांच्या निमंत्रणावरून 26 फेब्रुवारी रोजी छत्तीसगडमधील रायपूर येथे काँग्रेसच्या अधिवेशनात सहभागी होण्यासाठी गेली होती. यावेळी तिने संदीप सिंग यांना गांधींसोबत भेटीची वेळ मागितली. पण, त्यांनी प्रियंका गांधींची ओळख करून देण्यास नकार दिला. तसेच जातीवाचक शब्द आणि असभ्य भाषा वापरली. याशिवाय तिला जीवे मारण्याची धमकीही दिली. असे अर्चनाचे वडील गौतम यांनी आरोप केला आहे.

"बिग बॉसची (Bigg Boss) स्पर्धक आणि काँग्रेस नेत्या अर्चना गौतमला (Archana Gautam) धमकावल्याप्रकरणी काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी वड्रा यांच्या पीए विरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे." अशी माहिती मेरठ शहराचे एसपी पीयूष सिंह यांनी एएनआयला दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

आतिशी भाजपची बाहुली, दारू घोटाळ्यातील नेत्यांना वाचवण्यासाठी त्यांची धडपड सुरुये; गोवा काँग्रेसची बोचरी टीका

Goa Land Scam: 1200 कोटींच्या भूखंड घोटाळ्याचा पर्दाफाश, ईडीची गोवा आणि हैदराबादमध्ये छापेमारी, 72 लाखांसह 7 आलिशान गाड्या जप्त

पोर्तुगीजांनी नष्ट केलेल्या 1,000 मंदिरांच्या स्मरणार्थ स्मारक मंदिर उभारणार; दिवाडी बेटावर गोवा 'कोटीतिर्थ कॉरिडॉर' प्रकल्प राबवणार

Tomato Fever: टोमॅटोसारखे फोड अन् ताप... लहान मुलांमध्ये 'टोमॅटो फिव्हर'ने वाढवली चिंता; जाणून घ्या लक्षणे, कारणे अन् प्रतिबंधात्मक उपाय

''वीज खात्यान जाय तशे फोडून दवरल्यात रस्ते'' खड्डेमय रस्त्यांवरून पर्यटनमंत्र्यांचा 'वीजमंत्र्यांवर' निशाणा; Watch Video

SCROLL FOR NEXT