Bachhu Kadu: नाशिक आंदोलन आणि वाद! आमदार बच्चू कडू यांना 2 वर्षांची शिक्षा

नाशिक महापालिकेचे आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी बच्चू कडू यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता.
Bachchu Kadu
Bachchu KaduDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

अपक्ष आमदार आणि प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांना नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी आमदार कडू यांना शिक्षा सुनावण्यात आली आहे.

नाशिक महापालिकेचे आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी बच्चू कडू यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता.

आमदार बच्चू कडू यांनी 2017 सालच्या एका आंदोलनादरम्यान बच्चू कडू यांनी सरकारी कामांत अडथळा आणला होता. आंदोलना दरम्यान बच्चू कडू यांनी तत्कालीन महापालिका आयुक्तांवर हात उगारला होता. आयुक्तांनी गुन्हा दाखल केल्यानंतर, या प्रकरणाची सुनावणी नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात सुरू होती.

दरम्यान, आज न्यायालयाने कडू यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाने बच्चू कडू यांच्यावर दमदाटी करणे आणि सरकारी कामांत अडथळा आणणे, या दोन कलमांतर्गत दोषी ठरवलं आहे. 15 हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर बच्चू कडू यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे.

Bachchu Kadu
सिंधुदुर्गात सापडला पाण्यावर तरंगणारा दुर्मीळ 'प्युमिस' दगड

नेमकं प्रकरण काय?

नाशिक महापालिकेने दिव्यांग कल्याण निधी खर्च केला नाही. याबाबत 2017 साली प्रहारच्या माध्यमातून आंदोलन सुरु होते. यावेळी महापालिकेचे आयुक्त अभिषेक कृष्णा आणि आमदार बच्चू कडू यांच्यात चकमक झाली होती. कडू यांनी आयुक्तांवर हात देखील उगारला होता अशी माहिती समोर आली होती.

दरम्यान, आयुक्तांनी गुन्हा दाखल केल्यानंतर नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने कडू यांना 2 वर्षांची शिक्षा सुनावली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com