Viral Video 
देश

Viral Video: बापाने मुलाकडून घेतली अशी शपथ, व्हिडिओ पाहून नेटकरी भावूक; 'स्वतःचा जीव पणाला लावून...'

Viral Video News: सोशल मीडियावर दररोज विविध प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होतात. काही व्हिडिओ मजेशीर असतात, तर काही व्हिडिओ आपल्याला आश्चर्यचकित करतात.

Manish Jadhav

Viral Video News: सोशल मीडियावर दररोज विविध प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होतात. काही व्हिडिओ मजेशीर असतात, तर काही व्हिडिओ आपल्याला आश्चर्यचकित करतात. पण काही वेळा असेही व्हिडिओ समोर येतात, जे पाहून आपण भावूक होतो आणि नकळत त्या व्हिडिओमध्ये दडलेल्या भावना आपल्या मनाला चटका लावून जातात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे, ज्याने नेटकऱ्यांची मने जिंकली आहेत.

आधी हा व्हिडिओ पाहा!

व्हिडिओमध्ये काय घडले?

सध्या व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक वडील आपल्या मुलासोबत गणपती बाप्पा आणि लक्ष्मी मातेच्या मूर्तीसमोर उभे आहेत. वडील आपल्या मुलाला एक शपथ घ्यायला सांगतात. वडील मुलाला म्हणाले, “लक्ष्मी माता, गणपती बाप्पा, जर मी चुकीच्या मुलांसोबत राहिलो, तर माझ्या वडिलांचा मृत्यू होईल.”

सुरुवातीला तो मुलगा चुकीच्या मुलांसोबत राहणार नाही, असे म्हणतो, पण वडिलांच्या मृत्यूची शपथ घ्यायला तो नकार देतो. वडिलांनी त्याला वारंवार ती शपथ घेण्यास सांगितले, पण मुलगा ती शपथ घेण्यासाठी तयार होत नाही. व्हिडिओमध्ये दिसते की, मुलगा आपल्या वडिलांच्या मृत्यूची गोष्ट ऐकून रडू लागतो. तो शपथ घेताना खूप अस्वस्थ होतो. आसपासचे लोकही त्याला समजावण्याचा प्रयत्न करतात, पण वडील आपल्या मुलाला ती शपथ घेण्यासाठी आग्रह धरतात. वडिलांचा आग्रह पाहून अखेरीस तो मुलगा रडत-रडत ती शपथ घेतो.

वडिलांनी अशी शपथ का घेतली?

सुरुवातीला हा व्हिडिओ पाहून काही लोकांना प्रश्न पडू शकतो की, एक वडील आपल्याच मुलाला अशी शपथ का घ्यायला लावत आहेत. पण व्हिडिओच्या पुढील भागातून समजते की, वडिलांनी हे सर्व मुलाच्या चांगल्यासाठी केले आहे. वडील आपल्या मुलाला सुधारण्यासाठी आणि त्याला चांगल्या मार्गावर आणण्यासाठी स्वतःचा जीव पणाला लावण्यासाठी तयार आहेत. त्यांना हे जाणून घ्यायचे होते की, त्यांच्या मुलासाठी त्याचे जीवन किती महत्त्वाचे आहे. जेव्हा मुलगा रडू लागतो, तेव्हा स्पष्ट होते की, तो आपल्या वडिलांवर खूप प्रेम करतो आणि त्यांना काहीही होऊ नये अशी त्याची इच्छा आहे.

नेटकऱ्यांनी प्रतिक्रियांचा पाऊस पाडला

हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर mhato.shailesh नावाच्या अकाउंटने पोस्ट केला आहे. आतापर्यंत 5 लाखांहून अधिक लोकांनी या व्हिडिओला लाईक केले आहे. व्हिडिओ पाहून अनेक नेटकऱ्यांनी प्रतिक्रियांचा पाऊस पाडला. एका युजरने लिहिले, “वडील स्वतःसाठी नाही, तर आपल्या मुलासाठी ही शपथ घेत आहेत.” दुसऱ्या एका युजरने म्हटले, “वडील आपल्या मुलाला सुधारण्यासाठी स्वतःचा जीव द्यायलाही तयार आहेत.” तर एका युजरने, “हा मुलगा आपल्या वडिलांवर खूप प्रेम करतो,” अशी प्रतिक्रिया दिली. या व्हिडिओने दाखवून दिले आहे की, एका वडिलांचे आपल्या मुलावर किती प्रेम असते आणि ते त्याच्या चांगल्या भविष्यासाठी काहीही करु शकतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Water Metro in Goa: गोव्यात येतेय पहिलीवहिली 'वॉटर मेट्रो', मुरगाव ते तिसवाडी आता करा जलप्रवास; वाचा माहिती

कायदा हातात घ्याल, तर खबरदार - मुख्यमंत्री

Pakistan Khyber Airstrike: खुळ्यांची जत्रा! पाकिस्तानने आपल्याच लोकांवर टाकले 8 बॉम्ब; महिला, मुलांसह 30 जण ठार Video, Photo

Opinion: पोर्तुगीजांनी 'तिठे' उभारून बाजार भरवला, पण आज करोडो खर्चूनही विक्रेते रस्त्यावर का बसतात?

Opinion: गोव्यात 'भिवपाची गरज ना', असं गुंडांना वाटतंय; सामान्यांच्या मनात मात्र भीती!

SCROLL FOR NEXT