Drugs Seized in Goa: ट्रकमधून 1589 किलो गांजाची तस्करी करणाऱ्या ट्रकचालक पिता-पुत्राला पोलिसांनी अटक केली आहे. या गांजाची बाजारातील किंमत सुमारे साडे तीन कोटी रूपये असल्याचे सांगितले जात आहे. नागालँड राज्याच्या क्रमांकाच्या वाहनातून ही तस्करी होत होती. (Goa Drug Case)
बिहारच्या अररियामध्ये शहर पोलिस स्टेशन आणि जिल्हा गुप्तचर युनिटच्या पथकाने संयुक्त कारवाई करत गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई केली. तस्करीची ही मोठी खेप गुवाहाटीहून पश्चिम बंगालमार्गे बिहारमध्ये दाखल होत होती.
अररिया-पूर्णिया मार्गावरील जहांगीर बस्तीजवळील एका ढाब्यावर शहर पोलीस ठाणे आणि डीआययूच्या पथकाने ही कारवाई केली आहे. पोलिसांनी ट्रकमधून गांजाची 285 पाकिटे जप्त केली आहेत.
आरोपींनी ट्रक पेट्रोल पंपाशेजारी एका ढाब्याजवळ उभा केला होता. पोलीसांच्या पथकाने ट्रक जप्त करत चालक पिता-पुत्राला अटक केली आहे.
शहर पोलीस ठाण्याचे अध्यक्ष शिवशरण साह यांनी सांगितले की, आरोपी पिता-पुत्र दोघेही छपरा येथील बनियापूरचे रहिवासी असून त्यांची ओळख मोहम्मद अब्बास आणि तोहिद अशी आहे.
दोन्ही आरोपींचा गुन्हेगारी इतिहासही तपासला जात आहे. हा गांजा मोठ्या प्रमाणात कुठून आणला जात होता आणि त्याचे सेवन कोठून केले जाणार होते, याची चौकशी सुरू आहे. या मोहिमेत जिल्हा गुप्तचर विभाग आणि शहर पोलिस ठाण्याचे पथक सहभागी झाले होते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.