Farooq Abdullah Dainik Gomantak
देश

Farooq Abdullah: 'जीना यहाँ, मरना यहाँ...', संसदेच्या आवारात अब्दुल्लांनी गुणगुणले गाणे

Farooq Abdullah: लोकसभेचे खासदार फारुख अब्दुल्ला यांनी शुक्रवारी संसदेच्या आवारात 'मेरा नाम जोकर' चित्रपटातील एक प्रसिद्ध गाणे गुणगुणले.

दैनिक गोमन्तक

Farooq Abdullah Singing Song: आपल्या बेताल वक्तव्यांमुळे चर्चेत राहणारे लोकसभेचे खासदार फारुख अब्दुल्ला यांनी शुक्रवारी संसदेच्या आवारात 'मेरा नाम जोकर' चित्रपटातील एक प्रसिद्ध गाणे गुणगुणले. संसदेबाहेर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी 'जीना यहाँ मरना यहाँ... और कहाँ जाते हो...' हे गाणे गायले. मात्र हे गाणे गाताना ते भावूकही झाले.

दरम्यान, पत्रकारांशी बोलताना माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला (Farooq Abdullah) यांनीही आरजेडी नेते एबी सिद्दीकी यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली. अब्दुल्ला म्हणाले की, "भारतात द्वेषाचे राजकारण वाढले आहे, परंतु देश सोडणे हा पर्याय नाही. आपण एकजूट राहून द्वेषाच्या राजकारणाचा नायनाट केला पाहिजे."

काय म्हणाले एबी सिद्दीकी?

खरे तर, राष्ट्रीय जनता दलाचे ज्येष्ठ नेते एबी सिद्दीकी यांनी नुकतेच परदेशात राहणाऱ्या आपल्या मुलाला आणि मुलीला सांगितले की, 'भारत आता राहण्यासाठी देश राहिलेला नाही.' एका उर्दू वृत्तपत्राच्या कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केले. एबी सिद्दीकी पुढे म्हणाले की, मुलांनी परदेशात राहावे आणि शक्य असल्यास त्यांनी त्या देशाचे नागरिकत्व घ्यावे.' एबी सिद्दीकी यांच्या या वक्तव्यानंतर त्यांच्यावर टीका होत आहे.

फारुख अब्दुल्ला पठाण वादावर बोलले

लोकसभेचे खासदार फारुख अब्दुल्ला पुढे म्हणाले की, "शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) नवीन चित्रपटात (पठाण) भगव्या रंगाचे कपडे घालण्यावरुन वाद निर्माण झाला. याचा अर्थ भगवा हिंदूंचा आणि हिरवा मुस्लिमांचा आहे का? हे काय आहे? गाय हिंदूंची आणि बैल मुस्लिमांचे?"

फारुख अब्दुल्ला यांचे चीनला आव्हान

दुसरीकडे, फारुख अब्दुल्ला यांनीही चीनच्या मुद्द्यावर प्रतिक्रिया दिली आहे. चीनला आव्हान देताना ते म्हणाले की, 'हा आता 1962 चा भारत राहिला नाही, चीनला त्याच्याच भाषेत उत्तर दिले जाईल.' यापूर्वी फारुख अब्दुल्ला यांनी तवांगमधील भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये झालेल्या चकमकीवर म्हटले होते की, 'चीनशी चर्चा झाली पाहिजे.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT