Andhra Pradesh Accident  Dainik Gomantak
देश

Andhra Pradesh Accident: शिवरात्री उत्सवातून परतणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला, अपघातात 5 जणांचा मृत्यू

दुभाजकाला धडकल्यानंतर त्यांची कार उलटली आणि एका ट्रकने या कारला धडक दिली.

Pramod Yadav

Andhra Pradesh Accident: आंध्र प्रदेशातील बापटला जिल्ह्यात रविवारी पहाटे झालेल्या भीषण रस्ता अपघातात तीन महिला आणि एका 9 वर्षीय मुलीसह पाच जणांचा मृत्यू झाला.

हे सर्व लोक गुंटूरला जात असताना बापटला जिल्ह्यातील मेदारमेटलाजवळ महामार्गावरील दुभाजकाला धडकल्यानंतर त्यांची कार उलटली आणि त्यानंतर एका ट्रकने या कारला धडक दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही कार ओंगोलहून गुंटूरच्या दिशेने जात होती. त्यानंतर वाटेत चालकाचा वाहनावरील ताबा सुटून ते डिव्हायडरला धडकले.

यामुळे कार पलटी होऊन रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला पडली. यावेळी विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकने कारला धडक दिली.

चिन्नागंजममधील तिरुनाला येथे ड्युटीवर जात असताना, एसआय वाली यांनी पत्नी, मुलगी आणि शेजारच्या कुटुंबातील दोन महिलांना सोबत घेतले होते.

एका शिवमंदिराला भेट दिल्यानंतर, वाटेत अपघात झाला तेव्हा एसआयने कार चालकाला त्यांना परत अडंकी येथे सोडण्यास सांगितले. पोलिसांनी ही माहिती दिली आहे.

या अपघातात कारमधील पाचही जण जागीच ठार झाले. मृतांमध्ये आडंकी टाउनचे पोलीस उपनिरीक्षक शेख समंदर वाली यांच्या पत्नी आणि मुलीचा समावेश आहे. वहिदा (39), आयशा (09), जी. विजयश्री (50), जी. दिव्या तेजा (27) आणि चालक ब्रह्मचारी असे मृतांची नावे आहेत.

अपघाताची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. या अपघातात पूर्णत: मोडकळीस आलेल्या कारमधून मृतदेह बाहेर काढण्यासाठी पोलिसांना मोठी कसरत करावी लागली.

पोलिसांनी गुन्हा दाखल करून मृतदेह शवविच्छेदनासाठी अडंकी रुग्णालयात पाठवले आहेत. दरम्यान, पाच जणांचा मृत्यू झाल्याच्या वृत्तानंतर अडंकी शहरात शोककळा पसरली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Railway Diwali Bonus 2026: मोदी सरकारची रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, 10 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार बंपर बोनस; अखेर कॅबिनेटचा शिक्कामोर्तब

नाशिकच्या पाण्यत आढळले कर्करोगास कारणीभूत ठरणारे जीवघेणे रसायन; पर्यावरण संस्थेच्या अहवालात मोठा खुलासा

Farmers Drought Financial Relief: पावसाने हुलकावणी दिली पण सरकार धावून आले! दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना 'इतक्या' हजारांची मदत जाहीर; वाचा ताजी अपडेट

Unlucky Zodiac Signs: पैशांची घ्या काळजी! शुक्र अस्तामुळे 'या' 4 राशींना बसू शकतो मोठा आर्थिक फटका; पुढील 14 दिवस अत्यंत कसोटीचे

Goa Under 23 Cricket: गोव्याच्या युवा क्रिकेटपटूंचा बडोद्यावर दबदबा! 158 धावांची आघाडी, मोठ्या आघाडीची संधी

SCROLL FOR NEXT