Watch: 'तेलंगणा हे भारताचे अफगाणिस्तान, केसीआर तालिबान', वायएस शर्मिला यांच्या टिप्पणीवरून नवा वाद

महबूबाबादचे आमदार आणि बीआरएस नेते शंकर नाईक यांच्या विरोधात अयोग्य टिप्पणी केल्याप्रकरणी शर्मिला ताब्यात घेतले आहे.
YSRTP chief Sharmil
YSRTP chief SharmilDainik Gomantak
Published on
Updated on

YSRTP प्रमुख वायएस शर्मिला यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव (KCR) यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केली आहे. 'तेलंगण हे भारताचे अफगाणिस्तान आहे आणि केसीआर हे त्याचे तालिबान,' असल्याचे वादग्रस्त वक्तव्य शर्मिला यांनी रविवारी केले.

महबूबाबादमध्ये माध्यमांशी बोलताना शर्मिला यांनी हे वक्तव्य केले. 'ते (म्हणजेच तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर) हुकूमशहा आहेत, ते निर्दयी / अत्याचारी आहेत, तेलंगणात भारतीय संविधान नाही, फक्त केसीआरचे संविधान आहे.' असे त्यांनी म्हटले आहे.

विशेष म्हणजे, महबूबाबादचे आमदार आणि बीआरएस नेते शंकर नाईक यांच्या विरोधात अयोग्य टिप्पणी केल्याप्रकरणी वायएस शर्मिला यांना रविवारी तेलंगणा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

महबूबाबादमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी त्यांना हैदराबादला हलविले आहे. भारतीय दंड संहितेच्या कलम 504 (शांतता भंग करण्याच्या हेतूने हेतुपुरस्सर अपमान) आणि एससी / एसटी पीओए कायद्याच्या कलम 3 (1) आर अंतर्गत शर्मिला यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

YSRTP chief Sharmil
Mumbai: ऑनलाईन डिलिव्हरी घेताना काळजी घ्या! मुंबईतील एक व्यक्ती महिलांना पाठवायचा अश्लील व्हिडीओ

शनिवारी एका मेळाव्याला संबोधित करताना वायएस शर्मिला यांनी आश्वासने पूर्ण न केल्याबद्दल महबूबाबादच्या आमदारावर निशाणा साधला. "तुम्ही जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण केली नाहीत. तुम्ही तुमची आश्वासने पूर्ण करत नाही. याचा अर्थ तुम्ही नपुंसक आहात." या घटनेनंतर भारत राष्ट्र समितीने (BRS) शर्मिला यांच्याविरोधात जिल्ह्यात ठिय्या आंदोलन केले. ‘शर्मिला गो बॅक’च्या घोषणा देत आंदोलक वायएसटीआरपी प्रमुखांविरोधात रस्त्यावर उतरून पक्षाचे होर्डिंग आणि फ्लेक्स जाळत होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com