फेसबुक Dainik Gomantak
देश

अहवाल जाहिर करुन अकाउंटवर कारवाई केल्याची माहिती देणार फेसबुक

15 मे ते 15 जून या कालावधीत फेसबुकवरुन काढलेल्या कंटेंट बद्दल अंतरिम अहवालातुन देणार माहीती.

दैनि्क गोमन्तक वृत्तसेवा

सोशल मीडिया कंपनी फेसबुकने मंगळवारी सांगितले की, नवीन आयटी नियमांतर्गत येत असलेला पहिला अंतरिम अहवाल 2 जुलै रोजी जाहीर करणार आहे. या अहवालात 15 मे ते 15 जून दरम्यान फेसबुकवरून किती कंटेंट काढला गेला, याबद्दल माहिती दिली जाणार आहे. त्याचा अंतिम अहवाल 15 जुलै रोजी जाहीर करण्यात येणार आहे, ज्यामध्ये फेसबुक कडून वापरकर्त्यांकडून किती तक्रारी आल्या आहेत आणि त्यापैकी किती तक्रारींवर कारवाई करण्यात आली आहे हे सांगण्यात येईल. (Facebook will announce the report and inform the action taken on the account)

फेसबुकच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, या संदर्भातील अंतिम अहवाल 15 जुलै रोजी जाहीर केला जाईल. या अहवालात व्हॉट्सअ‍ॅप डेटाचाही समावेश केला जाणार आहे. तसेच कंपनीने स्पष्टीकरण दिले आहे की, फेसबुक 2 जुलै रोजी अंतरिम अहवाल देईल, ज्यामध्ये तक्रारींच्या प्राप्ती आणि निराकरणांविषयी माहिती नसल्यामुळे कंपनी सध्या या तक्रारींवर काम करत आहे. परंतु कंपनीच्या 15 जुलैच्या अहवालात तक्रारी आणि त्यांचे निराकरण यांचे संपूर्ण तपशील असतील.

चुकीचा कंटेंट 36 तासात काढला जाईल

नवीन आयटी नियम डिजिटल प्लॅटफॉर्मचा दुरुपयोग रोखण्यासाठी तयार केले गेले आहेत. त्याअंतर्गत सोशल मीडिया कंपन्यांना तक्रार निवारण अधिकारी नियुक्त करावे लागतात. तसेच, तक्रारींचे दुवे तपासणीनंतर हटवावे लागतील. कंटेंट काढण्याची प्रक्रिया 36 तासांच्या आत केली जाणे आवश्यक आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

SCROLL FOR NEXT