पुढील तीन दिवसांत दक्षिण, पश्चिम आणि उत्तर भारतातील अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस (Rain) पडण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाकडून (IMD) वर्तविण्यात आली आहे.
पुढील तीन दिवसांत दक्षिण, पश्चिम आणि उत्तर भारतातील अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस (Rain) पडण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाकडून (IMD) वर्तविण्यात आली आहे. Dainik Gomantak
देश

Monsoon Update: पुढील तीन दिवस 'या' राज्यांना अतिवृष्टीचा इशारा

दैनिक गोमन्तक

नवी दिल्ली: मान्सूनच्या (Monsoon) पुन्हा सक्रीय झाला असून, पुढील तीन दिवसांत दक्षिण, पश्चिम आणि उत्तर भारतातील अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस (Rain) पडण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाकडून (IMD) वर्तविण्यात आली आहे. कर्नाटक (Karnataka), तामिळनाडू (Tamil Nadu) आणि केरळमध्ये (Kerala) पुढील तीन दिवसांत मुसळधार पावसाचा अंदाज आहे. तीन दिवसानंतर याची तीव्रता कमी होईल.

संभाव्य कमी दाबाचे क्षेत्र पश्चिम-वायव्य दिशेने सरकत असून, ते चक्रीवादळाच्या प्रभावाखाली असल्याने, 5 ते 7 सप्टेंबरपर्यंत दक्षिण ओडिसा, आंध्र प्रदेश किनारपट्टी, तेलंगणा, विदर्भ आणि दक्षिण छत्तीसगडमध्ये बऱ्याच ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता आहे. तर 7 ते 9 सप्टेंबरपर्यंत उत्तर मराठवाडा, उत्तर मध्य महाराष्ट्र, उत्तर कोकण, गुजरातमध्ये पावसाची शक्यता आहे. 8 सप्टेंबरला उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्र आणि गुजरातच्या काही भागात आणि 7 सप्टेंबरला तेलंगणामध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. याच दरम्यान, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, उत्तर पंजाब, जम्मूत आणि पूर्व राजस्थानमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर उत्तर-पश्चिम भारताच्या बहुतांश भागांमध्ये देखील पावसाचा अंदाज आहे.

ऑगस्टमध्ये अपुरा पाऊस नोंदवल्यानंतर, आयएमडीने सप्टेंबरमध्ये जास्त पर्जन्यमानाचा अंदाज वर्तवला आहे. 31 ऑगस्टपर्यंत पावसात 9 टक्के तूट होती. सप्टेंबरमध्ये मॉन्सूनचा अंदाज जारी करताना, आयएमडीचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा म्हणाले, ऑगस्ट दरम्यान नोंदवलेली कमतरता चालू महिन्यात जास्त पावसामुळे भरून काढली जाण्याची शक्यता आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kanguva Teaser: 'कंगुवा'चा टीझर घालतोय धुमाकूळ; गोव्यासह ‘या’ खास ठिकाणी झालं बीग बजेट चित्रपटाचं शूटिंग

Goa Congress: सार्दिन घरात बसून विरियातोंचा प्रचार करतात; पाटकरांनी टोचले MP फ्रान्सिस यांचे कान

Prajwal Revanna: आम्ही व्हिसा दिला नाही… प्रज्वल रेवन्ना जर्मनीला पळून गेल्याच्या प्रश्नावर परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया

Shashi Tharoor In Goa: भाजपला धक्का बसणार, 400 नव्हे 200 पार करने देखील जड जाणार - थरुर

Goa Police : २४ वर्षांपासून अजूनही ‘ते’ न्यायाच्या प्रतिक्षेत; बडतर्फ पोलिसाची व्यथा

SCROLL FOR NEXT