Monsoon Update: दिल्लीसह अनेक राज्यात मॉन्सून पुन्हा सक्रिय

ऑगस्ट अखेरपर्यंत राज्यात 843.8 मिली पाऊसाची (Rain) नोंद झाली आहे. IMD च्या मते हिमाचल प्रदेशात 20 सप्टेंबरनंतरही पाऊस सुरू राहील. हैदराबादमध्ये 4 सप्टेंबर रोजी पावसाची शक्यता आहे.
दिल्ली आणि आसपासच्या भागाला सोमवार ते गुरुवारपर्यंत यलो अलर्ट चा इशारा देण्यात आला आहे.
दिल्ली आणि आसपासच्या भागाला सोमवार ते गुरुवारपर्यंत यलो अलर्ट चा इशारा देण्यात आला आहे.Dainik Gomantak
Published on
Updated on

नवी दिल्ली: दिल्लीमध्ये (Delhi) आज देखील सकाळी सुरुवात पावसाने (Rain) झाली आहे. हवामान विभागाने (IMD) आज दिल्लीसह काही भागात पावसाचा अंदाज वर्तवला होता. IMD ने आजसाठी ‘यलो अलर्ट’ (Yellow alert) आणि उद्या (रविवारी) ‘ग्रीन अलर्ट’ (Green Alert) जारी केला आहे. त्याचबरोबर पुढील आठवड्यासाठी सोमवार ते गुरुवारपर्यंत यलो अलर्ट चा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागानुसार, सोहना, अलिगढ, बुलंदशहर, खुर्जा, शिकारपूर, एटा येथेही पाऊस पडू शकतो.

दिल्ली आणि आसपासच्या भागाला सोमवार ते गुरुवारपर्यंत यलो अलर्ट चा इशारा देण्यात आला आहे.
''मॉन्सून म्हणजे पाऊस नव्हे'' 

दरम्यान, ओडिशा येथील भारतीय हवामानशास्त्र विभागाचे (IMD) वरिष्ठ शास्त्रज्ञ उमाशंकर म्हणाले, 6 सप्टेंबरनंतर वायव्य आणि मध्य बंगालच्या उपसागराजवळ कमी दाबाचे क्षेत्र तयार होऊ शकते. त्याच्या प्रभावाखाली 6 आणि 7 सप्टेंबर रोजी ओडिशाच्या बहुतेक भागात पाऊस पडू शकतो.

याशिवाय हिमाचल प्रदेशात, उत्तराखंड, हरियाणामध्ये 7 सप्टेंबरला, तर पश्चिम उत्तर प्रदेश आणि पूर्व राजस्थानमध्ये 6 आणि 7 सप्टेंबरला पाऊस अपेक्षित आहे. IMD च्या मते हिमाचल प्रदेशात 20 सप्टेंबरनंतरही पाऊस सुरू राहील. आतापर्यंत या हवामान खात्याकडून कोणताही अलर्ट जारी करण्यात आलेला नाही.

हवामान विभागाने शनिवारी पावसाबाबत यलो अलर्ट जारी केला आहे. IMD द्वारे वापरण्यात आलेल्या या रंगांच्या कोडचे अर्थ काय? ग्रीन अलर्ट म्हणजे सर्व चांगले, यलो अलर्ट म्हणजे खूप वाईट हवामान विभागाच्या मते, 6 सप्टेंबरच्या आसपास बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होईल, जे पश्चिम दिशेपासून पुढे सरकेल त्यामुळे दिल्ली आणि त्याच्या आसपासच्या भागात 6 सप्टेंबरपासून मान्सून सक्रिय होऊ शकतो.

आयएमडीच्या मते, हैदराबादमध्ये 4 सप्टेंबर रोजी पावसाची शक्यता आहे. याशिवाय 5 आणि 6 सप्टेंबरला येथे हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. सप्टेंबरची सुरूवात मुसळधार पावसापासून झाली आहे. दिल्ली आणि त्याच्या आसपासच्या भागात पुढील काही दिवस पाऊस सुरूच राहणार आहे. मात्र, आता मुसळधार पावसाची शक्यता कमी आहे. परंतु हलका ते मध्यम पाऊस पुढील सहा ते सात दिवस सुरू राहील. यामुळे तापमान देखील 31 ते 34 अंशांच्या आसपास राहील. हवामान खात्याच्या अंदाजानुसार आज हलका पाऊस पडेल. 7 सप्टेंबरला दिल्लीत मध्यम तर 8 सप्टेंबरला हलक्या पावसाची शक्यता आहे.

दिल्ली आणि आसपासच्या भागाला सोमवार ते गुरुवारपर्यंत यलो अलर्ट चा इशारा देण्यात आला आहे.
Monsoon: बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने राज्यात पावसाची शक्यता

महाराष्ट्रात ऑगस्टअखेर पर्यंत 843.8 मिली पाऊस

ऑगस्ट अखेरपर्यंत राज्यात 843.8 मिली पाऊसाची नोंद झाली आहे. ऑगस्ट महिन्यात ब्रेक घेतलेल्या पावसाची विदर्भात उणे 14 टक्के नोंद झाली आहे. तर उर्वरीत राज्यातील अनेक भागात पावसाने कशीबशी सरासरी पार केली आहे. राज्यात मध्य महाराष्ट्रातील नंदूरबार, विदर्भात बुलडाणा, अमरावती, गोंदिया, गडचिरालीमध्ये सरासरीच्या तुलनेत कमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.

1 जून ते 31 ऑगस्टपर्यंत राज्यात विभाग निहाय झालेला पाऊस पुढील प्रमाणे:

विभाग सरासरी प्रत्यक्ष पडलेला पाऊस टक्केवारी

कोकण 2516.8 2792.5 11

मध्य महाराष्ट्र 594.9 614.6 3

मराठवाडा 503.6 597.4 19

विदर्भ 784.3 672.1 उणे 14

महाराष्ट्र 824.5 843.8 2

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com