PM Kisaan Dainik Gomantak
देश

पीएम-किसान’ योजनेच्या ई-केवायसीसाठी पुन्हा मुदतवाढ

राज्यातील 1 कोटी 9 लाख 46 हजार लाभार्थ्यांना मिळाला लाभ

Sumit Tambekar

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने सुरु झालेली प्रधानमंत्री किसान सन्मान निधी या योजनेचा लाभ घेण्यासाठी केंद्र शासनाने लाभार्थ्यांनी त्यांची ओळख पडताळणी (ई-केवायसी) पूर्ण करण्यासाठी अट घातली आहे. याची मुदत आता वाढली आहे. यामूळे अद्याप माहिती देणे अपेक्षित असलेली माहिती भरुन या योजनेचा शेतकऱ्यांना लाभ घेता येणार आहे. म्हणून केंद्र शासनाने योजनेच्या लाभार्थ्यांनी त्यांची ओळख पडताळणीसाठी 31 जुलै 2022 पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे. (Extension for e-KYC of PM-Kisan scheme again)

शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळण्याकरीता या योजनेअंतर्गत सरसकट सर्व पात्र शेतकरी कुटुंबीयास (पती, पत्नी व त्यांची 18 वर्षाखालील अपत्य) 2 हजार रुपये प्रती हप्ता या प्रमाणे 3 हप्त्यात 6000 रुपये प्रती वर्षी लाभ त्यांच्या बँक खात्यात थेट जमा करण्यात येत आहे. आज अखेर या योजनेअंतर्गत राज्यातील 1 कोटी 9 लाख 46 हजार लाभार्थ्यांना एकूण 18 हजार 151 कोटी 70 लाख रुपये लाभ अदा करण्यात आलेला आहे.

लाभार्थ्यास स्वतः पीएम किसान पोर्टलवर किंवा सामाईक सुविधा केंद्रामार्फत ई-केवायसी पडताळणी करण्याच्या सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. या दोनपैकी स्वत:च्या सोईनुसार एका सुविधेच्या आधारे लाभार्थ्यास त्याची ई-केवायसी पडताळणी करता येईल. यापूर्वी ई-केवायसी 31 मे 2022 पूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले होते.

पती आणि पत्नी दोघांनाही पीएम किसान योजनेचा लाभ मिळू शकतो का ?

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही केंद्र सरकारद्वारे चालवली जाणारी एक विशेष योजना आहे, ज्या अंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 6 हजार रुपये आर्थिक सहाय्य म्हणून दिले जातात. या योजनेंतर्गत हे 6 हजार रुपये एका वर्षात तीन हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवले जातात. म्हणजेच तीन वेळा दोन हजार रुपयांचा हप्ता थेट लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात येतो. या योजनेचे नऊ हप्ते यापूर्वीच शेतकऱ्यांच्या खात्यात आले असून नुकताच केंद्र सरकारने 10 वा हप्ताही जारी केला आहे. या योजनेचा लाभ 2 हेक्टरपर्यंत लागवडीयोग्य जमीन असलेल्या अशा अल्पभूधारक शेतकरी कुटुंबांना उपलब्ध आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT