Nitin Gadkari Dainik Gomantak
देश

Election 2023: 'आम्ही साधू-संन्यासी नाही...'- नितीन गडकरींचे निवडणुकांवर वक्तव्य

Election 2023: विरोधी पक्षांच्या म्हणण्यानुसार, यावर्षी 9 राज्यात निवडणुका होणार आहेत आणि त्यामुळे शासन नवीन प्रकल्प आणत आहे.

दैनिक गोमन्तक

Election 2023: केंद्रिय परिवहन आणि हायवे मंत्री नितीन गडकरी यांनी आगामी निवडणुकांबाबत वक्तव्य केले आहे. 2023 मध्ये 9 राज्यांमध्ये निवडणुका होणार आहेत. यावर गडकरींनी म्हटले आहे की, प्रत्येक नेता निवडणुका लक्षात ठेऊनच राजकारणात येत असतो.

आम्ही राजकारणात आलो आहोत. आम्ही कोणी साधू संत नाही. पुजा-अर्चना करण्यासाठी राजकारणात आलो नाही तर निवडणुका लढण्यासाठी आलो आहोत. ज्यांचे काम चांगले आहे त्यांना जनता निवडणून देते. प्रत्येक पक्ष असाच असतो.

दक्षिणेकडील राज्ये मोठे नुकसान होत असूनदेखील मोफत वीज( Electricity) पुरवतात. विरोधी पक्षांच्या म्हणण्यानुसार, यावर्षी 9 राज्यात निवडणुका होणार आहेत आणि त्यामुळे शासन नवीन प्रकल्प आणत आहे. यावर गडकरींनी म्हटले आहे की , देशात कोणते असे राज्य आहे जिथे रोड बनला नाही.

नितिन गडकरींनी असेही म्हटले आहे की, मी निवडणुका बघून टार्गेट्स आखत नाही. काही टार्गेटस आखली आहेत. 2024 संपेपर्यत भारतात युएस दर्जाचे इनफ्रास्टक्चर पुर्ण केले जाईल असेही त्यांनी म्हटले आहे. काम करत राहिले पाहिजे आणि मी काम करण्यावर विश्वास ठेवतो असे वक्तव्य नितीन गडकरी यांनी निवडणुकां( Election) बाबत केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shani Budh Vakri: शनि-बुध ग्रहांचा राशीबदल 'या' तीन राशींसाठी भाग्यकारक; धनलाभ ते प्रेमविवाहापर्यंत संधींचे दार उघडणार

Goa Crime: प्रत्येकाने कायदा हातात घ्यायला सुरुवात केली तर; गोव्यात, देशात ‘जंगल राज’ निर्माण व्हायला वेळ लागणार नाही

Goa Ranji: नवीन मोसम, नवीन प्रशिक्षक! 'गोवा क्रिकेट'ची परंपरा सुरुच; बडोद्याचे 'मेवाडा' सहावे कोच नियुक्त

Goa News Live Updates: मुसळधार पावसाचा फटका; पणजी, ताळगाव, सांताक्रूझ आणि सांत आंद्रे परिसरात मर्यादीत पाणी पुरवठा

Durand Cup: 'ड्युरँड कप' होणार गोव्याशिवाय! गोमंतकीय संघांची नोंदणी नाही; संघ बांधणी प्रक्रिया पूर्ण नाही

SCROLL FOR NEXT