EPF Balance Check Dainik Gomantak
देश

EPF Balance Check: कंपनी तुमच्या पीएफचे पैसे जमा करतेय का नाही? खात्यातील रक्कम तपासायची संपूर्ण प्रोसेस जाणून घ्या

How to check PF balance: कर्मचार्‍यांचा भविष्य निर्वाह निधी हा भारतातील सर्वात महत्त्वाचा निवृत्ती निधी योजनांपैकी एक आहे

Sameer Amunekar

EPF Balance Enquiry Online

कर्मचार्‍यांचा भविष्य निर्वाह निधी हा भारतातील सर्वात महत्त्वाचा निवृत्ती निधी योजनांपैकी एक आहे. EPF हे कर्मचारी भविष्य निधी संघटनाद्वारे व्यवस्थापित केले जाते आणि हे वैधानिक निवृत्ती लाभ योजनांपैकी एक आहे.

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी योजना ही भारत सरकारद्वारे लागू केलेली निवृत्ती बचत योजना आहे. यामध्ये कर्मचारी आणि नियोक्ता मासिक वेतनाच्या एक ठराविक टक्केवारीप्रमाणे योगदान करतात.

मात्र, अनेक वेळा कर्मचाऱ्यांच्या ईपीएफ खात्यात कंपन्या पैसे जामा करत नसल्याची प्रकरण देखील समोर आले आहेत. त्यामुळं तुमच्या EPF खात्यात पैसे जमा होतात की नाही? हे जाणून घ्यायचं असेल, तर तुम्ही सोप्या पद्धतीनं तुमच्या खात्यातील रक्कम तपासू शकता.

EPF खात्याचे फायदे

सेवानिवृत्तीनंतर आर्थिक स्थैर्य: दीर्घकालीन बचतीसाठी मदत.
कर सवलती: EPF हे 80C अंतर्गत करमुक्त आहे.
व्याजदर: EPFO ठरवलेल्या व्याजदरानुसार तुम्हाला उत्पन्न मिळते.
आपत्कालीन फंड: घरखरेदी, शिक्षण, लग्न किंवा आरोग्यविषयक आपत्कालीन परिस्थितीत EPF मधून काही रक्कम काढता येते.
ऑनलाइन सेवा: EPFO पोर्टलद्वारे खाते व्यवस्थापन, पासबुक तपासणी, EPF बॅलन्स आणि क्लेम प्रक्रिया सोपी झाली आहे.

बॅलन्स कसा तपासायचा?

EPFO पोर्टलद्वारे: EPFO Unified Portal या अधिकृत वेबसाइटला भेट द्या. येथे तुमचा UAN (Universal Account Number), पासवर्ड आणि कॅप्चा प्रविष्ट करा. लॉगिन केल्यानंतर ‘Passbook’ पर्याय निवडा आणि तुमचे पीएफ खाते तपासा.

मेसेजद्वारे: तुमच्या रजिस्टर्ड मोबाइल नंबरवरून खालील क्रमांकावर SMS पाठवा. EPFOHO UAN ENG आणि पाठवा 7738299899 वर.(इंग्रजीसाठी "ENG", मराठीसाठी "MAR" वापरा).

मिस्डकाॅलद्वारे बॅलन्स तपासा: तुमच्या रजिस्टर्ड मोबाइल नंबरवरून 011-22901406 वर मिस्ड कॉल द्या. तुम्हाला पीएफ खात्यातील शिल्लक एसएमएसद्वारे मिळेल.

अ‍ॅपद्वारे बॅलन्स तपासा: UMANG अ‍ॅप डाउनलोड करा. अ‍ॅपमध्ये EPFO पर्याय निवडा आणि UAN व OTP वापरून लॉगिन करा. तुमचा पीएफ शिल्लक आणि पासबुक पाहा.

पैसे कसे काढायचे?

  • EPFO Member Portal येथे लॉगिन करा.

  • तुमचा UAN, पासवर्ड आणि कॅप्चा प्रविष्ट करून लॉगिन करा.‘Online Services’ टॅबमध्ये जा आणि ‘Claim (Form-31, 19, 10C & 10D)’ निवडा.

  • तुमची बँक खाते माहिती दाखवा आणि Proceed for Online Claim वर क्लिक करा.

  • Claim Type निवडा: पूर्ण रक्कम (Final Settlement), अंशतः रक्कम (Partial Withdrawal) किंवा पेन्शन.

  • अर्ज सबमिट करा आणि आधार OTP व्हेरिफिकेशन करा.

  • तुमचा अर्ज EPFO कडे पाठवला जाईल आणि तुम्हाला स्टेटस ट्रॅक करता येईल.पैसे खात्यात जमा होण्यासाठी 5-15 दिवस लागू शकतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

Goa Rain Update: गोव्यात जिकडे तिकडे पाणीच पाणी! पावसाचा रौद्रावतार; आपत्कालीन यंत्रणा सतर्क

Rahul Keni: गोव्याचे राहुल केणी बनले BCCIचे सामनाधिकारी! पंच परीक्षेत मिळवला सहावा क्रमांक

Goa Cyber Crime: रिचार्ज पॅक साठी फोन केला, 44 हजार रुपये केले लंपास; गोकुळवाडी-साखळीतील महिलेला गंडा

SCROLL FOR NEXT