Encounter underway between security forces and terrorists in the Cheyan Devsar area of Kulgam
Encounter underway between security forces and terrorists in the Cheyan Devsar area of Kulgam ANI
देश

जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा जवानांनी दहशतवाद्यांना घेरले

दैनिक गोमन्तक

श्रीनगर: जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये सध्या चकमक सुरू आहे. पोलीस आणि लष्कराने दहशतवाद्यांना घेरले आहे. हा कुलगामचा देवसर परिसर आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या ऑपरेशनमध्ये जैश-ए-मोहम्मदचे 2 ते 3 दहशतवादी अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. सध्या या चकमकीबाबत लष्कराकडून फारशी माहिती देण्यात आलेली नाही. मात्र, रात्री उशिरापासून गोळीबार सुरू असल्याचे बोलले जात आहे. गेल्या आठवड्यातच सुरक्षा दलांनी कुलगाम जिल्ह्यातून दोन 'हायब्रीड' दहशतवाद्यांना अटक केली होती. यातील एक दहशतवादी लष्कर-ए-तैयबाचा होता. (Kulgam Jammu Kashmir Attack)

जम्मू-काश्मीरच्या श्रीनगरमध्ये शनिवारी दहशतवाद्यांनी एका पोलिसाची गोळ्या झाडून हत्या केली. जखमी कॉन्स्टेबलला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र नंतर त्याचा मृत्यू झाला. शहरातील सफाकदल भागातील आयवा पुलाजवळ ही घटना घडली. सकाळी 8.40 च्या सुमारास जम्मू-काश्मीर पोलिसांचे कॉन्स्टेबल गुलाम हसन यांच्यावर दहशतवाद्यांनी गोळीबार केला.

3 हिजबुल दहशतवादी ठार

खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात सुरक्षा कर्मचार्‍यांचे ऑपरेशन सुरू आहे, जम्मू आणि काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यात शुक्रवारी सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत हिजबुल मुजाहिद्दीनचे 3 दहशतवादी ठार झाले. जिल्ह्यातील पहलगाम भागातील श्रीचंद वनक्षेत्रात दहशतवादी असल्याची गुप्तचर माहिती मिळाली होती. त्यानंतर सुरक्षा दलांनी तिथं घेराबंदी आणि शोध मोहीम सुरू केली. तेथे आधीच उपस्थित असलेल्या दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. सुरक्षा दलांनी त्यांना प्रत्युत्तर दिले, त्यानंतर शोध मोहिमेचे चकमकीत रूपांतर झाले.

200 दहशतवाद्यांची घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात

उत्तर लष्कराचे कमांडर लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी अलीकडेच सांगितले होते की खोऱ्यातील घुसखोरीमध्ये मोठी घट झाली आहे. मात्र असे असतानाही 200 दहशतवादी सीमेपलीकडून जम्मू-काश्मीरमध्ये घुसण्याचा प्रयत्न करत आहेत. फेब्रुवारी २०२१ च्या करारापासून भारत-पाकिस्तान सीमेवरील युद्धविराम चांगले काम करत असल्याचेही त्यांनी सांगितले.

21 परदेशी दहशतवादी ठार

लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांच्या म्हणण्यानुसार, सध्या खोऱ्याच्या अंतर्गत भागात 40 ते 50 स्थानिक दहशतवादी आणि विदेशी दहशतवादी देखील सक्रिय आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, सुरक्षा जवानांनी आतापर्यंत 21 विदेशी दहशतवाद्यांना ठार केले आहे. दहशतवाद्यांना मिळणारा आश्रय आणि पाठिंबा दिवसेंदिवस कमी होत असल्याचे बोलले जात आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Goa News: गोव्यात लैंगिक अत्याचाराचे आरोप असलेले मंत्री, पोलिसांवर राजकीय दबाव; इंडिया आघाडीचा आरोप

Ponda Murder Case: सांताक्रुज, फोंड्यात मामाकडून भाच्याचा खून

Canada PM Justine Trudeau: जस्टिन ट्रुडो यांच्यासमोर 'खलिस्तानी घोषणा'; भारताने कॅनडाच्या राजदूताला बोलावून नोंदवला निषेध

दोन महिन्यात कसे वाढवले 40 हजार फॉलोअर्स, गोव्याच्या इन्फ्लुएन्सरने शेअर केलं सिक्रेट

Sahil Khan Arrested: गोव्यासह पाच राज्यातून दिवस-रात्र प्रवास; बेटिंग घोटाळ्यात अडकलेला साहिल खान अखेर गजाआड

SCROLL FOR NEXT