Elon Muks SpaceX Star Link Dainik Gomantak
देश

Starlink In India: भारतात स्टारलिंक इंटरनेट सेवेसाठी मस्क यांच्या कंपनीने पुन्हा केला अर्ज

स्पेसएक्सने मागितला परवाना; जिओ, एअरटेल या कंपन्यांसमोर आव्हान

गोमन्तक डिजिटल टीम

Starlink In India: भारतात स्टारलिंकची इंटरनेट सेवा सुरू करण्यासाठी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलन मस्क यांनी पुन्हा तयारी सुरू केली आहे. मस्क यांची कंपनी स्पेसएक्सने यासाठी दुरसंचार विभागाकडे GMPCS परवान्यासाठी पुन्हा अर्ज केल्याची माहिती आहे.

स्टार लिंक ही एलन मस्क यांची उपग्रहाधारित इंटरनेट सेवा आहे. ही सेवा भारतात विस्तार करण्याचा प्रयत्न करत आहे. स्टार लिंक या सेवेला मस्क यांची स्पेसएक्स ही कंपनी चालवते. कंपनीने ग्लोबल मोबाईल पर्सनल कम्युनिकेशन बाय सॅटेलाईट सर्व्हिसेस परवान्यासाठी दुरसंचार विभागाकडे पुन्हा अर्ज केला आहे.

या आधीही कंपनीने भारतात सेवेसाठी प्रयत्न केला होता. गतवर्षी कंपनीने स्टारलिंक इंटरनेट सर्व्हिसेससाठी नोंदणीही सुरू केली होती. तथापि, दुरसंचार विभागाच्या इशाऱ्यानंतर कंपनीने काही दिवसांनंतर प्री बुकिंग बंद केले.

दुरसंचार विभागाने ग्राहकांना स्टारलिंकसाठी नोंदणी न करण्याचा सल्ला दिला होता. कारण कंपनीला परवाना मिळालेला नव्हता. मंजुरी न मिळाल्याने तुमच्या भागात सुविधा उपलब्ध नाही, असे स्टारलिंकने वेबसाईटवर म्हटले होते. आता गेल्या आठवड्यातच स्पेसएक्सने या परवान्यासाठी अर्ज दाखल केला आहे.

जर स्टारलिंकला हा परवाना मिळाला तरी देखील कंपनीला लगेचच इंटरनेट सेवा सुरू करता येणार नाही. कारण कंपनीला भारतीय राष्ट्रीय अंतराळ संवर्धन आणि प्राधिकरण केंद्र (IN-SPACe) विभागाचीही मंजुरी घ्यावी लागेल, गरजेचे स्पेक्ट्रम खरेदी करावे लागतील.

या मंजुरीनंतरही कंपनीला देशात अर्थ स्टेशन स्थापित करावी लागतील. स्पेसएक्स ही अंतराळात लाँचिंग सेवा देणारी जगातील अग्रगण्य कंपनी आहे. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्टेशन (आयएसएस) पर्यंत अंतराळयात्रींना पोहचविणारी ही खासगी कंपनी आहे.

दरम्यान, भारतात स्पेस टेलिकम्युनिकेशन्सच्या शर्यतीत केवळ एलन मस्क हेच एकटे नाहीत तर जिओ आणि एअरटेल देखील यात आहेत. भारती एअरटेल यासाठी Hughes सोबत जॉईंट व्हेंचरवर काम करत आहे.

भारती एअरटेल आणि जिओने यापुर्वीच परवाना मिळवला आहे. 5G नंतर आता सॅटेलाईट कनेक्टिव्हिटी हा मोठा खेळ असणार आहे. त्यातून ग्रामीण आणि सुदुर भागातही कनेक्टिव्हिटी पोहचवील जाऊ शकेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Today's Live Updates Goa: शव प्रदर्शन सोहळा एक आंतरराष्ट्रीय कार्यक्रम बनणार आहे: मुख्यमंत्री

St. Xavier Exposition: 46 दिवसांचा वाहतूक आराखडा तयार; जाणून घ्या सर्व पर्यायी मार्ग आणि पार्किंग व्यवस्था

IFFI 2024: Golden Peacock साठी 7 चित्रपटांत चुरस! पदार्पणातील पारितोषिकासाठी 2 Indian Films स्पर्धेत..

Goa Opinion: केवळ मुसलमान म्हणून विरोध?

Priya Yadav Case: 'प्रिया'चे Cash For Job कनेक्शन महाराष्ट्रापर्यंत? ‘ते’ रेल्वे अधिकारी कोण? रोज नवीन भानगडी उघडकीस

SCROLL FOR NEXT