Election Commission will announce final voter list today

 
Dainik Gomantak
देश

Assembly Election: निवडणूक आयोग आज अंतिम मतदार यादी जाहीर करणार

पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांसह या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे

दैनिक गोमन्तक

भारत निवडणूक आयोगाकडून (ECI) आज पाच राज्यांमधील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी (Assembly election 2022) नवीन मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. निवडणूक आयोगाने लखनौच्या दौऱ्यात स्पष्ट केले होते की, नवीन मतदार यादी 5 जानेवारीपर्यंत प्रसिद्ध केली जाईल आणि त्यानंतर निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या जातील. दरम्यान, यूपीचे मुख्य निवडणूक अधिकारी (CEO) अजय कुमार शुक्ला आज दुपारी 3 वाजता लखनऊमध्ये मतदार यादीच्या पुनरावलोकनासंदर्भात निवडणूक आयोगाच्या कार्यालयात पत्रकार परिषद घेणार आहेत. मतदार यादी प्रसिद्ध करण्याची ही शेवटची तारीख असल्याने सीईओ पत्रकार परिषदेत याबाबत महत्त्वाची माहिती देऊ शकतील. ईसीआय एक आभासी बैठक देखील घेणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीत 10 प्रमुख मुद्द्यांवर चर्चा केली जाणार आहे.

ECI अधिकाऱ्यांसोबत व्हर्च्युअल बैठक घेणार आहे

या बैठकीनंतर, ECI राज्य अधिकाऱ्यांसोबत व्हर्च्युअल बैठकाही घेणार आहे. अधिकाऱ्यांमधील बैठक संपल्यानंतरच निवडणूक कशी होणार याबाबत निवडणूक आयोग अंतिम निवेदन देईल. ECI मणिपूरचे CEO, DGP, मुख्य सचिव, इतर वरिष्ठ अधिकारी आणि राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसोबत व्हर्च्युअल बैठक देखील घेईल.

विधानसभा निवडणुकीत (Assembly Election) जिल्ह्यातील 22 लाख 95 हजार 987 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये 12 लाखांहून अधिक पुरुष मतदार आणि 10 लाखांहून अधिक महिला मतदारांचा सहभाग आहे. तर 80 मतदार हे तृतीय लिंगाचे आहेत. भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार मतदार यादीची अंतिम प्रसिध्दी आज मतदान केंद्रांवर करण्यात येणार आहे. जिथे लोक स्वतःचे आणि कुटुंबातील सदस्यांचे नाव पाहू शकतील. मात्र, आयोगाच्या संकेतस्थळावर जाऊन मतदार यादी घरी बसून पाहण्याची सुविधा देण्यात आली आहे.

डिजिटल मोबाईलद्वारे यादी पाहता येईल

यावेळी जिल्ह्यातील सहा विधानसभा आणि एका अर्धवट भागात मतदारांची संख्या 22 लाख 95 हजार 987 वर पोहोचली आहे. यावेळी 12 लाख 15,084 पुरुष, 10 लाख 80,823 महिला आणि 80 तृतीय पंथी मतदारांचा शुद्ध मतदार यादीत समावेश आहे. 2829 बूथवर मतदार यादीची अंतिम प्रसिद्धी करण्यात येणार आहे. ज्यामध्ये लोक मतदार यादीत स्वतःचे आणि कुटुंबातील सदस्यांचे नाव पाहू शकतील.

त्याचबरोबर घरी बसूनही डिजिटल मोबाईलद्वारे मतदार यादी पाहता येणार आहे. यासाठी गुगलवर www.nvsp.in ही लिंक टाकून नविन पेज ओपन करावे लागेल. ज्यामध्ये electrolar.in वर क्लिक करून तुम्ही तुमचे नाव, वडिलांचे किंवा पतीचे नाव, पत्ता, विधानसभा इत्यादी माहिती टाकून मतदार यादीतील आपले नाव पाहू शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

Calangute Illegal CRZ Construction: कळंगुटमधील अनधिकृत बांधकामांची 'घटका' जवळ! 'एनजीटी'कडून 'जीसीझेडएमए'चा पाडकाम आदेश कायम

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट! वार्षिक वेतनवाढ 3 टक्क्यावरून 5 टक्के होणार? पगारात नेमकी किती वाढ होईल? जाणून घ्या

Goa Illegal liquor Seizure: कोंड्याच्या पोत्यांचा आडोसा अन् दारूची तस्करी! पेरणे अबकारी अधिकाऱ्यांच्या दक्षतेमुळे 3 लाख 78 हजारांचा माल जप्त

SCROLL FOR NEXT