देशात पाच राज्यांच्या निवडणुका पार पडत आहेत. यातच उत्तरप्रदेश सारख्या मोठ्या राज्यामध्ये तीन टप्प्यातील निवडणुका पार पडल्या आहेत. मात्र राज्यातील राजकीय वातावरण खूपच गढूळ बनत चालले आहे. याच पाश्वभूमीवर निवडणूक आयोगाने (Election Commission) रविवारी उत्तर प्रदेशमधील (Uttar Pradesh) एका भाजप उमेदवाराला प्रक्षोभक वक्तव्य केल्याबद्दल नोटीस बजावली आहे. त्यांनी प्रथमदर्शनी आचारसंहिता आणि निवडणूक कायद्याचे उल्लंघन केल्याचे समोर आले आहे. अमेठीतील तिलोई विधानसभा मतदारसंघातील (Tiloi Assembly Constituency) भाजपचे (BJP) उमेदवार मयंकेश्वर शरण सिंह (Mayankeshwar Sharan Singh) यांना उत्तर देण्यासाठी निवडणूक आयोगाने 24 तासांचा अवधी दिला आहे. (Election Commission Notice To BJP Candidate For Making Inflammatory Speech)
दरम्यान, नोटीसचा एक भाग असलेल्या कथित व्हिडिओ क्लिपमध्ये यंकेश्वर शरण सिंह यांनी म्हटले होते, "...जर तुम्हाला भारतात राहायचे असेल... 'राधे-राधे', अन्यथा जसे फाळणीच्या वेळी लोक पाकिस्तानात गेले होते, तसे तुम्हीही जाऊ शकता... इथे तुमची गरज नाही.
तसेच, हा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. आयोगाने सांगितले की, सिंग यांच्याविरुद्ध 18 फेब्रुवारी रोजी भारतीय दंड संहिता आणि लोकप्रतिनिधी कायद्याच्या कलमांतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला होता.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.