'तेलंगणाच्या निर्मितीमध्ये शरद पवारांनी मदत केली'

तेलंगणाचे मुख्यमंत्री के. सी. राव यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शरद पवार यांची भेट घेतली.
Telangana Chief Minister K. C. Rao &  Sharad Pawar
Telangana Chief Minister K. C. Rao & Sharad PawarDainik Gomantak
Published on
Updated on

देशातील राजकारण मागील काही दिवसांपासून चांगलंच गाजत आहे. पाच राज्यांच्या निवडणुका पार पडत असताना दुसरीकडे महाराष्ट्रातील राजकारण पुन्हा एकदा वेगळ्याच वळणावर चाललं आहे. याच पाश्वभूमीवर तेलंगणाचे मुख्यमंत्री के. सी. राव यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांच्याशी प्रदिर्घ चर्चा केली. त्यानंतर तेलंगणाचे मुख्यमंत्री के. सी. राव यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रमुख शरद (Sharad Pawar) यांची भेट घेतली. त्यांच्यामध्येही देशातील सध्याच्या परिस्थितीवर प्रदिर्घ अशी चर्चा पार पडली. (Sharad Pawar helped create Telangana)

दरम्यान के. सी. राव यांनी पत्रकारांशी बोलताना म्हणाले, ''देशातील राजकारण मागील काही दिवसांपासून वेगळ्या दिशेने चालले आहे. देशात सूडाचे राजकारण सुरु झाले आहे. त्यामध्येच आम्ही भेटून विकासाच्या मुद्यावर चर्चा केली. तेलंगणाच्या निर्मीतीमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी आम्हाला मदत केली होती. समविचारी पक्षांनी एकत्र येवून भाजपचा विरोध केला पाहिजे. तसेच आम्ही यासंबंधी समेलंन देखील घेणार आहोत.''

Telangana Chief Minister K. C. Rao &  Sharad Pawar
'सूडाचं राजकारण म्हणजे आमचं हिंदुत्व नाही'

त्यानंतर पवार म्हणाले, ''मी आज तेलंगणाचे मुख्यमंत्री के. सी. राव यांना भेटलो. त्यांच्याशी भेटून आम्ही देशातील सध्याच्या राजकारणासंबंधी चर्चा केली आहे. देशातील शेतकऱ्यांकडे केंद्र सरकाचे होत असलेले दुर्लक्ष आम्ही पाहत आहोत. चर्चेमध्ये आम्ही जास्तीत जास्त विकासाच्या मुद्यावर बोललो.''

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com