Election Commission Dainik Gomantak
देश

Assembly Elections 2022: रॅली आणि रोड शोवर बंदी कायम?

केंद्रीय आरोग्य सचिवांसोबत आज निवडणूक आयोगाची बैठक

दैनिक गोमन्तक

उत्तराखंड, पंजाब, गोवा, मणिपूरमध्ये राज्य विधानसभा निवडणूकांचे (Assembly Elections 2022) बिगूल वाजले आहे. पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची घोषणा सुरू झाली आहे. राजकीय गोंधळाच्या काळात राजकीय पक्षांनी निवडणूक जिंकण्यासाठी सर्व शक्ती पणाला लावली आहे. नेत्यांचे पक्ष बदलण्याची प्रक्रियाही सुरू आहे. या सर्व प्रकाराने राजकीय नेत्यांची भाषणबाजी आणि गटबाजीही चव्हाट्यावर येऊ लागली आहे. राजकारणाशी संबंधित अनेक घडोमोडी या राज्यांमध्ये घडत आहे.

निवडणूक आयोगाची आज महत्त्वाची बैठक

रॅली, रोड शो, पथ सभा आदींवरील बंदीचा आढावा घेऊन निवडणूक आयोग (Election Commission) आज दुसऱ्यांदा थेट रॅली घेण्याबाबत निर्णय घेणार आहे. यासाठी आयोग आपत्ती व्यवस्थापनाशी (Union Health Secretary) पाच राज्यांमध्ये सुरू असलेले लसीकरण, कोरोना संसर्गाचा रिकव्हरी रेट आणि मृत्यू दर जाणून घेवून कोरोना मानकांच्या पूर्ततेबाबत सल्लामसलत करणार. या बैठकीत निवडणूक आयोग, आरोग्य मंत्रालय, NITI आयोग, पाच निवडणूक राज्यांचे मुख्य सचिव, निवडणूक अधिकाऱ्यांसोबत आढावा घेणार आहे.

निवडणूक आयोगाने राजकीय पक्षांना डिजिटल माध्यमातून प्रचार करण्याचे आवाहन केले होते. यावर निवडणूक आयोग आज काय निर्णय घेते यावर काहीही सांगणे कठीण आहे, कारण काल शुक्रवारी भारतात सुमारे 3.50 लाख नवीन कोविड रुग्णांची नोंद झाली आहे. गुरुवारच्या 3.17 लाख प्रकरणांपेक्षा हा आकडा नऊ टक्के अधिक आहे. तसेच गेल्या आठ महिन्यांतील उच्चांक 3.85 कोटी प्रकरणांसह, भारत अमेरिकेनंतर जगातील दुसरा सर्वाधिक कोविड प्रभावित देश आहे.

देशातील कोरोना संसर्गाच्या वाढत्या प्रकरणांमुळे, निवडणूक आयोगाने 8 जानेवारी रोजी सर्व राज्यातील निवडणुकांच्या तारखा जाहीर करताना, 15 जानेवारीपर्यंत सर्व प्रकारच्या रॅलींवर बंदी घातली होती आणि केवळ आभासी प्रचारांना परवानगी दिली होती. निवडणूक आयोगाने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार राजकीय पक्षांची पदयात्रा, सायकल यात्रा किंवा रोड शो करण्यास बंदी घालण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Donald Trump: ''...तर आज इस्रायलचे अस्तित्वच नसते'' लेबनॉनमधील कारवाईवरुन ट्रम्प यांचे खळबळजनक वक्तव्य; नेतन्याहूंच्या युद्धनीतीवर सवाल

FIFA World Cup 2026: उरुग्वेकडून खेळतोय 'गोव्या'शी नातं असलेला खेळाडू; सौदी अरेबियाविरुद्ध केला निर्णायक गोल, कोण आहे Maximiliano Araujo?

Goa Village News: उसगाव-गांजेतील घरपट्टी शुल्कात होणार कपात; विशेष ग्रामसभेत ठराव संमत, गरिबांना होणार लाभ

Mayem Kayaking Service: मये तलावात 'कायाकिंग' बोटिंग सेवा सुरू

Emergency Health Services: आपत्कालीन आरोग्य सेवा होणार अधिक सक्षम; 24 तास नियंत्रण कक्ष उभारण्याचा प्रस्ताव, 108 सेवेचा सखोल आढावा

SCROLL FOR NEXT