ED summons Hemant Soren Dainik Gomantak
देश

ED summons Hemant Soren: 'ईडी' करणार झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची चौकशी

बेकायदा खाण उत्खनन प्रकरणी समन्स; उद्या 11 वाजता उपस्थित राहण्याचे आदेश

गोमन्तक डिजिटल टीम

ED summons Jharkhand CM: झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) बेकायदा उत्खनन प्रकरणी नोटीस पाठवली आहे. एएनआय या वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार सोरेन यांना ईडीने गुरूवारी सकाळी 11 वाजता चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे.

यापुर्वी ईडीने रांची येथील विशेष न्यायालयात हेमंत सोरेन, बच्चू यादव आणि प्रेम प्रकाश यांचे निकटवर्तीय पंकज मिश्रा यांच्याविरोधात पीएमएलए नुसार बेकायदा उत्खनन प्रकरणी आरोपपत्र दाखल केले होते. मिश्रा यांच्यावर झारखंड आणि बिहारमध्ये खंडणी वसुलीचाही आरोप आहे.

सोरने यांना ईडीने नोटीस पाठविल्याने झारखंडमध्ये राजकारण तापले आहे. विरोधकांकडून केंद्र सरकारवर सातत्याने तपास यंत्रणांचा दुरूपयोग केल्याचा आरोप केला जात आहे. तथापि, ईडीने या प्रकणात यापुर्वी 47 ठिकाणी छापे टाकले होते.

यावर्षीच मे महिन्यात तत्कालीन आयएएस अधिकारी आणि आता निलंबित केलेल्या झारखंडच्या माजी उत्खनन सचिव पूजा सिंघल यांना ईडीने अटक केली होती. सिंघल यांच्याशी कथितरित्या संबंधित मनरेगा निधी घोटाळ्यात 5000 पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. ईडीने या प्रकरणात झारखंड मुक्ति मोर्चाचे (झामुमो) माजी खजानिस रवी केजरीवाल यांचीही चौकशी केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Donald Trump: "इराणला जगाच्या नकाशावरुन पुसून टाकू!" डोनाल्ड ट्रम्प यांची खुलेआम धमकी; लवकरच पडणार युद्धाची ठिणगी? VIDEO

Chimbel Unity Mall: चिंबल प्रकल्पांवरुन पेच कायम! 'प्रशासन स्तंभ' रद्द करण्याचे संकेत, मात्र 'युनिटी मॉल'बाबत मुख्यमंत्री ठाम

High Court: "सनातन संपवण्याची भाषा म्हणजे नरसंहाराला चिथावणी" निवडणूक वर्षात उदयनिधि स्टालिन यांना हायकोर्टाकडून चपराक!

"मुक्या प्राण्यांच्या जिवाची इतकीच किंमत का?" मर्सिडीजनं कुत्र्याला चिरडलं, कोर्टानं केली 150 रुपयांत सुटका! प्राणीप्रेमींचा संताप

NH66 Highway Goa: राष्ट्रीय महामार्ग 66 बाबत नवीन अपडेट! रुंदीकरणाचे काम होणार सुरु; 764 कोटी मंजूर

SCROLL FOR NEXT