K. Kavitha  Dainik Gomantak
देश

K. Kavitha ED enquiry: तेलंगणाचे CM केसीआर यांच्या आमदार मुलीची आज ईडी चौकशी

दिल्लीतील मद्य घोटाळ्यातील सहभागाची चौकशी करणार

Akshay Nirmale

K. Kavitha ED enquiry: दिल्ली मद्य धोरण प्रकरणाची धग आता दक्षिणेतही पोहचली आहे. या प्रकरणात सक्तवसुली संचालनालय (ईडी) तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (केसीआर) यांच्या आमदार मुलीची चौकशी करणार आहे.

राव यांची कन्या के. कविता या भारत राष्ट्र समितीच्या तेलंगणा विधान परिषदेतील आमदार आहेत. दरम्यान, ईडीच्या समन्सनंतर कविता या दिल्लीत पोहचल्या आहेत.

दिल्ली उत्पादन शुल्क धोरणाशी संबंधित प्रकरणातील के. कविता यांच्या कथित भूमिकेबाबत त्यांची चौकशी केली जात आहे. या प्रकरणाशी संबंधित हेराफेरीमध्ये कविता यांचा थेट संबंध असल्याचे ईडीच्या सूत्रांचे म्हणणे आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, या संदर्भात ईडीने के. कविता यांच्या हैदराबादस्थित कथितरित्या त्यांच्या जवळचे व्यावसायिक अरुण रामचंद्रन पिल्लई यांचीही चौकशी करू शकते. पिल्लई यांना आठवडाभरापूर्वी ईडीने अटक केली होती.

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्यात महिला आरक्षण विधेयक मंजूर करण्याच्या मागणीसाठी के. कविता यांनी शुक्रवारी दिल्लीतील जंतरमंतरवर उपोषण केले होते.

सीपीआय (एम)चे सरचिटणीस सीताराम येचुरी यांच्या उपस्थितीत दिल्लीच्या जंतरमंतरवर झालेल्या सहा तासांच्या उपोषणाला विरोधी पक्षांनीही पाठिंबा दिला होता. कविता यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीही या विषयात रस दाखवून महिलांच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT