Suresh Raina and Shikhar Dhawan Dainik Gomantak
देश

Illegal Betting Case: ईडीची मोठी कारवाई! सुरेश रैना आणि शिखर धवन यांची 11.14 कोटींची संपत्ती जप्त; 'वन एक्स बेट'चा प्रमोशन करार पडला महागात

Money Laundering Probe: गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक किंवा मोठ्या प्रमाणावर कर चोरी केल्याच्या आरोपांची ईडी चौकशी करत असताना रैना आणि धवन ईडीच्या रडारवर आले.

Manish Jadhav

Illegal Betting Case: क्रिकेट जगतातून एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. कथित अवैध बेटिंग साइट चालवल्याच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात सक्तवसुली संचालनालय म्हणजेच ईडीने भारताचे दोन माजी क्रिकेटपटू सुरेश रैना आणि शिखर धवन यांची एकूण 11.14 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली. 6 नोव्हेंबर रोजी ईडीच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली.

नेमकं प्रकरण काय?

अनेक अवैध सट्टेबाजी ॲप्सकडून (Betting Apps) नागरिक आणि गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक किंवा मोठ्या प्रमाणावर कर चोरी केल्याच्या आरोपांची ईडी चौकशी करत असताना रैना आणि धवन ईडीच्या रडारवर आले. 'वन एक्स बेट' (1xBet) नावाच्या ऑनलाइन बेटिंग साइटविरुद्धच्या या प्रकरणात ईडीच्या तपासात आढळले की, या दोन्ही माजी क्रिकेटपटूंनी 'वन एक्स बेट' आणि त्याच्या सरोगेट्सच्या प्रमोशनसाठी (Endorsement) विदेशी कंपन्यांसोबत जाणीवपूर्वक करार केले.

इतर सेलिब्रिटीही ईडीच्या चौकशीच्या फेऱ्यात

ईडीच्या या कारवाईमुळे क्रिकेट आणि मनोरंजन क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणाच्या तपासाअंतर्गत ईडीने रैना आणि धवन यांच्या व्यतिरिक्त अनेक नामवंत व्यक्तींची चौकशी केली, ज्यात माजी क्रिकेटपटू युवराज सिंग आणि रॉबिन उथप्पा, अभिनेता सोनू सूद आणि उर्वशी रौतेला तसेच माजी तृणमूल काँग्रेस खासदार आणि बंगाली अभिनेत्री मिमी चक्रवर्ती आणि बंगाली अभिनेता अंकुश हाजरा यांचा समावेश होता.

सप्टेंबरमध्ये झाली चौकशी

रैना आणि धवन यांना सप्टेंबरमध्ये कथित अवैध सट्टेबाजी ॲपशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात चौकशीसाठी ईडीसमोर हजर करण्यात आले होते. यावेळी त्यांचे 'वन एक्स बेट'शी संबंधित तपासाच्या अंतर्गत PMLA कायद्याखाली जबाब नोंदवण्यात आले होते. बाजार विश्लेषण फर्म आणि तपास यंत्रणांच्या मते, सध्या भारतात सुमारे 22 कोटी लोक ऑनलाइन सट्टेबाजी ॲप्सचा वापर करत आहेत, त्यापैकी निम्मे नियमित वापरकर्ते आहेत. ईडीच्या या कारवाईनंतर अवैध बेटिंग ॲप्सचा प्रचार करणाऱ्या अन्य सेलिब्रिटींवरही कारवाईची टांगती तलवार असल्याचे बोलले जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मतदार याद्यांच्या कामास नकार, 'AE'ला घेतले ताब्यात; सरकारी ड्युटीवरून नवा वाद!

IND vs AUS: यॉर्कर किंगचा 'विराट' रेकॉर्ड! जसप्रीत बुमराह ठरला ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी20 मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज; सईद अजमलचा मोडला विक्रम

IND vs AUS: चौथ्या टी-20 मध्ये 'सूर्या ब्रिगेड' सरस! भारताचा 48 धावांनी दणदणीत विजय; भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर कांगारु गारद VIDEO

'हा' बॉलिवूड अभिनेता बनणार 'कांतारा' फेम ऋषभ शेट्टीचा औरंगजेब! 2027 मधील सर्वात मोठ्या चित्रपटाची चर्चा

Goa Crime: भाडेकरुनेच केला मालकाचा आणि मित्राचा खून? दुहेरी हत्याकांडाने हादरले साळीगाव! पोलिसांकडून तपास सुरु

SCROLL FOR NEXT