Viral E-Rickshaw Stunt Video: आजच्या युगात सोशल मीडिया एक असे व्यासपीठ बनले आहे, जिथे तरुण, वृद्ध आणि मुलेही मोठ्या संख्येने सक्रिय आहेत. दररोज हजारो फोटो आणि व्हिडिओ या प्लॅटफॉर्मवर पोस्ट केले जातात, त्यापैकी काही लोकांचे लक्ष वेधून घेतात आणि व्हायरल होतात. सध्या असाच एक स्टंटचा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे, ज्यामध्ये एका व्यक्तीने ई-रिक्षाने अविश्वसनीय स्टंट करण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, हा व्हिडिओ पाहणाऱ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. रोज सोशल मीडियावर बाईक किंवा कारचे स्टंट पाहणाऱ्यांसाठी हा व्हिडिओ मात्र थोडा वेगळा आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, रस्ता एका ठिकाणी संपतो आणि समोरच मातीची तीव्र चढण सुरु होते. ही चढाई इतकी सरळ आणि तीव्र आहे की सामान्य वाहनांनाही ती पार करणे अत्यंत कठीण आहे.
अशा धोकादायक ठिकाणी, एक व्यक्ती ई-रिक्षा घेऊन चढाव चढण्याचा प्रयत्न करतो. अर्थात, रिक्षाची क्षमता आणि चढाईची तीव्रता यामुळे हा स्टंट अयशस्वी ठरतो. जसा चालक रिक्षा पुढे नेण्याचा प्रयत्न करतो, तशी ती ई-रिक्षा थेट मागच्या बाजूला उभी राहते आणि अक्षरशः हवेत लटकल्यासारखी दिसते. रिक्षा 90 अंशाच्या कोनात उभी राहिल्याने व्हिडिओ पाहणारे काही क्षणांसाठी श्वास रोखून धरतात. सुदैवाने, या व्यक्तीला कोणतेही गंभीर नुकसान झाले नाही, पण हा स्टंट पाहतानाच अंगावर काटा येतो.
हा धोकादायक स्टंट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 'totosatan' नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. बातमी लिहेपर्यंत, या व्हिडिओला 24 हजारहून अधिक लोकांनी लाईक केले आहे. एवढा स्पष्ट धोका असतानाही असे धाडस का केले, असा प्रश्न अनेक वापरकर्त्यांनी उपस्थित केला आहे.
हा व्हिडिओ पाहून लोकांनी अनेक मजेदार आणि टीकात्मक प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका वापरकर्त्याने गंमतीने लिहिले, "याला अवॉर्ड अंशुमान द्यायला हवा." दुसऱ्या एका वापरकर्त्याने आश्चर्य व्यक्त करत लिहिले की, "हे कोण वेडे लोक आहेत?" तर, एका युजरने रिक्षाच्या आर्थिक बाजूवर लक्ष वेधत लिहिले, "EMI ची रिक्षा आहे." अनेक वापरकर्त्यांनी हसणाऱ्या इमोजी पोस्ट करुन आपली प्रतिक्रिया दिली आहे.
मनोरंजन आणि प्रसिद्धी मिळवण्यासाठी सोशल मीडियावर दररोज अनेक धोकादायक स्टंट्सचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. परंतु, अशा स्टंट्समुळे स्वतःच्या आणि इतरांच्या जीवाला धोका पोहोचू शकतो. त्यामुळे, प्रसिद्धीच्या मागे धावताना अनावश्यक धोका पत्करणे टाळणे आवश्यक आहे, असा संदेश हा व्हिडिओ देतो.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.