'माकां कोकणी चालियो.." विवाह फेम अमृता राव बोलते अस्सल कोकणी, सोशल मीडियावर Video Viral; चाहते थक्क!

Amrita Rao Konkani Video: रणवीरच्या पॉडकास्टमध्ये विवाह सिनेमातील फेम अभिनेत्री अमृता रावसहभागी झाली होती आणि यावेळी तिने रणवीरला चक्क कोकणी बोलायला शिकवले
Amrita Rao Viral Video
Amrita Rao Viral VideoDainik Gomantak
Published on
Updated on

Amrita Rao Speaks Konkani: गेल्या काही काळापासून सोशल मीडियावर प्रसिद्ध पॉडकास्टर रणवीर अलाहबादीया खूप लोकप्रिय झाला आहे. त्याच्या पॉडकास्टमधील रंजक प्रश्नांमुळे अनेक प्रेक्षक त्याचे चाहते बनले आहेत. नुकतीच रणवीरच्या पॉडकास्टमध्ये विवाह सिनेमातील फेम अभिनेत्री अमृता रावसहभागी झाली होती आणि यावेळी तिने रणवीरला चक्क कोकणी बोलायला शिकवले. अमृताला कोकणी बोलताना पाहून तिचे चाहते आश्चर्याने थक्क झाले आहेत.

अमृताने शिकवले कोकणीतील 'हे' वाक्य

सध्या व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये अमृता राव रणवीरला कोकणी बोलायला शिकवताना दिसत आहे. सुरुवातीला ती त्याला पाण्याला कोकणीत 'उदक' म्हणतात असे सांगते. यानंतर अमृता त्याला एक खास वाक्य शिकवते, "माका कोकणी चालियो खूब आवडताती," ज्याचा अर्थ 'मला कोकणी मुली खूप आवडतात' असा होतो. हे ऐकल्यानंतर अमृता गंमतीने म्हणते की, आता कोकणी पालक त्यांच्या मुलींसाठी रणवीरचा हात मागायला येतील.

अमृता राव गोव्याची नाही, तर कर्नाटकातील

अमृता रावची मूळ भाषा कोकणी असली तरी ती गोव्याची कोकणी नाही, हे अनेकांना माहीत नाही. ती कर्नाटकच्या मंगलोर येथील चित्रपुर सारस्वत ब्राह्मण कुटुंबातून येते. त्यामुळे ती बोलत असलेली कोकणी भाषा कर्नाटकातील आहे, जी गोव्याच्या कोकणीपेक्षा थोडी वेगळी आहे.

Amrita Rao Viral Video
Viral Video: 'तडपाओगे तडपा लो...!’ चिमुकलीनं गायलं लतादीदीचं गाणं, क्यूटनेसनं जिंकली नेटकऱ्यांची मनं; सोशल मीडियवर धूमाकूळ

दीपिका पदुकोणची चुलत बहीण

अमृता राव प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पदुकोण हिची चुलत बहीण आहे, हे काही दिवसांपूर्वी या व्हिडिओमुळे पुन्हा समोर आले होते. दीपिका पदुकोण आणि अमृता राव या चुलत बहिणी आहेत, २०१५ मध्ये एका कोकणी लग्नातील फोटोमुळे त्यांच्यातील हे नाते उघड झाले होते. त्यांचे कुटुंब एकच असल्याने त्यांच्यातही एक भावनिक नाते तयार झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com